मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Paytm : फास्टॅगमधून पेटीएम आऊट! NHAI ने जाहीर केली अधिकृत बँकांची यादी

Paytm : फास्टॅगमधून पेटीएम आऊट! NHAI ने जाहीर केली अधिकृत बँकांची यादी

Feb 17, 2024, 09:14 AM IST

    • Paytm FASTags Latest Updates : एनएचएआयने फास्टॅग पेमेंट साठी बँकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यातुन पेटीएमला वगळण्यात आले आहे. या यादीत ३२ बँकांच्या समावेश आहे.  
Paytm FASTags Latest Updates

Paytm FASTags Latest Updates : एनएचएआयने फास्टॅग पेमेंट साठी बँकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यातुन पेटीएमला वगळण्यात आले आहे. या यादीत ३२ बँकांच्या समावेश आहे.

    • Paytm FASTags Latest Updates : एनएचएआयने फास्टॅग पेमेंट साठी बँकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यातुन पेटीएमला वगळण्यात आले आहे. या यादीत ३२ बँकांच्या समावेश आहे.  

Paytm FASTags Latest Updates : देशभरातील दोन कोटींहून अधिक पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रोड टोलिंग ऑथॉरिटीने महामार्गावरील प्रवाशांना पेटीएम पेमेंट्स बँक वगळता ३२ बँकांची यादी जाहीर केली असून या अधिकृत बँकांकडून फास्टॅग व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे. या यादीतून पेटीएम पेमेंटला वगळण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला पुढील महिन्यापासून सेवा देणे बंद केले आहे. अशा परिस्थितीत २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम फास्टॅग सेवा बंद होणार आहे. एनएचएआयची इलेक्ट्रॉनिक टोलिंग शाखा आयएचएमसीएलने अधिकृत बँकांची यादी त्यांच्या अधिकृत हँडलवर शेअर केली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळी पावसाचे ढग! 'या' जिल्ह्यात बरसणार; असे असेल हवामान

हायवेवर टोलनाक्यावर विनाथांबा प्रवास करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ३२ अधिकृत बँकांपैकी कोणत्याही बँकेकडून तुमचा फास्टॅग खरेदी करण्याचे आयएचएमसीएलने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या जाहीर करण्यात आलेल्या ३२ अधिकृत बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, त्रिशूर जिल्हा सहकारी बँक, साउथ इंडियन बँक, सारस्वत बँक, नागपूर नागपूर सहकारी बँक, कोटक महिंद्रा बँक, करूर वैश्य बँक, जे अँड के बँक, इंडसइंड बँक, इंडियन बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, फिनो बँक यांचा समावेश आहे. , इक्विटेबल स्मॉल फायनान्स बँक, कॉसमॉस बँक, सिटी युनियन बँक लिमिटेड, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, एयू स्मॉल फायनान्स बँक, एअरटेल पेमेंट्स बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक यांचा समावेश आहे.

यापूर्वी, आयएचएमसीएलने १९ जानेवारी २०२४ रोजी लिहिलेल्या पत्रात पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन फास्टॅग देण्यास रोखले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ३१ जानेवारी रोजी पेटीएमच्या युनिट पेमेंट बँक लिमिटेडला २९ फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहक खाते, प्रीपेड उत्पादन, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारू नयेत असे निर्देश दिले होते. तथापि, कोणतेही व्याज, 'कॅशबॅक' किंवा 'परतावा' कधीही ग्राहकांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.

Pune viral Video : वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये आढळल्या लाल अळ्या; पुण्याच्या हिंजवडीतील व्हिडीओ व्हायरल

ईडीने केली पेटीएम अधिकाऱ्यांची चौकशी

पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पेटीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि अनेक कागदपत्रे गोळा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय एजन्सी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) अंतर्गत फिनटेक कंपनीमध्ये आरबीआयने जाहीर केलेल्या कथित अनियमिततेची औपचारिक चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की, पेटीएम अधिकाऱ्यांनी अलीकडेच काही कागदपत्रे सादर केली होती, त्यानंतर त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. तसेच आणखी काही माहितीही मागवली आहे. ते म्हणाले की, सध्या कोणतीही अनियमितता आढळून आली नाही. फेमा अंतर्गत कोणतेही उल्लंघन आढळल्यासच या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.

विभाग

पुढील बातम्या