मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sumitra Mahajan : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाबाबत सुमित्रा महाजनांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...

Sumitra Mahajan : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाबाबत सुमित्रा महाजनांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...

Jan 28, 2023, 04:19 PM IST

    • BJP leader Sumitra Mahajan : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालपदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राज्याचे पुढचे राज्यपाल कोण होणार?, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sumitra Mahajan On Maharashtra Politics (HT)

BJP leader Sumitra Mahajan : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालपदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राज्याचे पुढचे राज्यपाल कोण होणार?, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

    • BJP leader Sumitra Mahajan : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालपदातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राज्याचे पुढचे राज्यपाल कोण होणार?, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sumitra Mahajan On Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त राज्यपाल ठरलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यपालपदातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यामुळं आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्याही क्षणी कोश्यारींचा राजीनामा घेण्याची शक्यता असून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार याची चर्चा सुरू असतानाच माजी लोकसभा अध्यक्षा आणि भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांनी राज्यपालपदासाठी तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सुमित्रा महाजन यांनी देखील महाराष्ट्राचं राज्यपालपद स्वीकारण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भाजपा नेत्या सुमित्रा महाजन म्हणाल्या की, देशातील तिसऱ्या सर्वात मोठ्या नंबरचं पद मी भूषवलेलं आहे. त्यामुळं आता मनात कोणतीही इच्छा राहिलेली नाही. त्यासाठी माझ्यात ताकदही राहिलेली नाही. परंतु भाजपानं पालक म्हणून पाठवलं तर महाराष्ट्रात जाईल, पद म्हणून नाही. त्यामुळं पार्टीला सांगा आणि मला महाराष्ट्राचं पालक करा, असं वक्तव्य सुमित्रा महाजन यांनी केल्यामुळं आता त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी देखील सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता त्यांनी याबाबत स्वत: खुलासा केला आहे.

राज्यपालपदासाठी कोणत्या नावांची चर्चा?

राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेतल्यास पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, ओम माथूर आणि सुमित्रा महाजन यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळं आता राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार?, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे.

पुढील बातम्या