मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  US Politics : अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करा; माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी

US Politics : अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करा; माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी

Dec 06, 2022, 08:54 AM IST

    • Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. आता त्यांनी थेट अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची मागणी केल्यानं नवा वाद पेटला आहे.
Donald Trump Controversial Statement (AP)

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. आता त्यांनी थेट अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची मागणी केल्यानं नवा वाद पेटला आहे.

    • Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. आता त्यांनी थेट अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची मागणी केल्यानं नवा वाद पेटला आहे.

Donald Trump Controversial Statement : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करण्याची धक्कादायक मागणी केली आहे. त्यामुळं आता त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटलं असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी रिपब्लिकन ट्रम्प आणि इतर नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

Viral News : पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवत होता १७ वर्षीय रॅपर, गोळी झाडली गेल्याने अचानक मृत्यू

Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार आणि फसवणूक झाल्याचं वक्तव्य पुन्हा केलं आहे. मात्र आपल्या आरोपांकडे आणि सत्यतेकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. याशिवाय जो बायडन यांचं सरकार बेकायदेशीरपणे सत्तेत आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ट्वीटरचे मालक इलोन मस्क यांच्यात जो बायडेन यांचा पुत्र हंटर बायडेन यांच्यातील कथित इमेल संवादाची चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यावरूनही ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर टीका करत राज्यघटना रद्द करण्याची मागणी केली आहे.

कॅपिटल हिल्समध्ये हिंसा भडकावल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप...

डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिल परिसरात धुडगुस घालत हिंसाचार केला होता. याशिवाय संसद परिसराचीही तोडफोड केली होती. या समर्थकांना हिंसेसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आहे. याशिवाय ट्रम्प यांनी ट्वीटरवरून प्रक्षोभक ट्वीट्स केल्यामुळं त्यांचं खातं बंद करण्यात आलं होतं. त्यामुळं आता माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या राज्यघटना बरखास्त करण्याच्या मागणीमुळं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

विभाग

पुढील बातम्या