मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fire In Firecrackers Shop : आंध्र प्रदेशात फटाक्यांच्या दुकानाला आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Fire In Firecrackers Shop : आंध्र प्रदेशात फटाक्यांच्या दुकानाला आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Oct 23, 2022, 11:33 AM IST

    • Fire In Firecrackers Shop Vijayawada : सुरुवातीला आग केवळ एका फटाक्यांचा दुकानाला लागली होती. परंतु त्यानंतर आगीनं उग्र रुप धारण केल्यानं त्यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Fire In Firecrackers Shop Vijayawada Andhra Pradesh (HT)

Fire In Firecrackers Shop Vijayawada : सुरुवातीला आग केवळ एका फटाक्यांचा दुकानाला लागली होती. परंतु त्यानंतर आगीनं उग्र रुप धारण केल्यानं त्यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

    • Fire In Firecrackers Shop Vijayawada : सुरुवातीला आग केवळ एका फटाक्यांचा दुकानाला लागली होती. परंतु त्यानंतर आगीनं उग्र रुप धारण केल्यानं त्यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Fire In Firecrackers Shop Vijayawada Andhra Pradesh : दिवाळीचा सण काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच आता आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहरात फटाक्यांच्या शॉपला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जेव्हा ही आग लागली तेव्हा फटाके खरेदी करण्यासाठी स्टॉलवर अनेक लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही आग केवळ एकाच दुकानात लागली होती. परंतु दुकानं एकमेकांना खेटून असल्यानं आगीनं उग्र रुप धारण केलं ज्यात संपूर्ण दुकानांना आग लागली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय दोन जणांचा आगीत होरपळल्यानं मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

दिवाळीच्या सणाला देशातील अनेक शहरांमध्ये फटाक्याचे स्टॉल लागलेले आहेत. फटाक्यांची विक्री करताना व्यापाऱ्यांकडून सुरक्षेचे अनेक नियम पायदळी तुडवले जातात. त्यातच आता दिवाळीच्या आधीच विजयवाड्यात फटाक्यांच्या दुकानांना आग लागल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे.

मुंबईत बेकायदा फटाक्यांच्या दुकानांवर बंदी...

ग्राहकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता पोलिसांनी मुंबईत बेकायदा फटाक्यांच्या दुकानांवर बंदी घातली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी रितसर परवानगी घेऊन आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं आहे, त्यांनाच फटाक्यांच्या विक्रीसाठी मुंबईत परवानगी देण्यात आली आहे.

पुढील बातम्या