मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रेमात धोका दिला म्हणून प्रेयसीचा गळा चिरून तरुणाची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं यवतमाळमध्ये खळबळ
Ghatanji Yavatmal Crime News
Ghatanji Yavatmal Crime News (HT_PRINT)

प्रेमात धोका दिला म्हणून प्रेयसीचा गळा चिरून तरुणाची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं यवतमाळमध्ये खळबळ

23 October 2022, 11:12 ISTAtik Sikandar Shaikh

Yavatmal Crime News : मृत गजानन आणि कोमल यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते एकांतात भेटण्यासाठी घाटंजीतील शेतात आले होते, तेव्हा त्यांच्या गप्पा मारताना वाद झाला आणि गजाननं टोकाचं पाऊल उचललं.

Ghatanji Yavatmal Crime News : गप्पागोष्टी करताना सुरू झालेल्या वादातून प्रियकरानं प्रेयसीचा गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली असून गजानन दत्ताजी ढोणे असं मृत तरुणाचं नाव आहे. त्यानं आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं असून त्याची प्रेयसी कोमलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातल्या वाकी दुधाना शिवारात ही घटना घडली आहे. मृत गजानन याचं कोमल नावाच्या एका तरुणीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. एकांतात गप्पा मारण्यासाठी गजानन हा तरुणीला एका पडीक शेतात घेऊन आला होता. दोघे गप्पा मारत असताना त्यांच्यात अचानक वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या गजानन याने कोमलच्या गळ्यावर चाकूनं सपासप वार केले आणि त्यानंतर तिच्या ओढणीच्या सहाय्यानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

प्रेमात धोका दिल्यानंच गजानन यानं उचललं टोकाचं पाऊल...

कोमलनं प्रेमात धोका दिल्यामुळं गजानन संतापलेला होता. त्यामुळं त्यानं कोमलला भेटायला येताना चाकू आणि कटर सोबत आणलं होतं. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतापलेल्या गजानन यानं कोमलवर चाकूनं वार केल्यानंतर आत्महत्या केली. त्यानंतर त्याच भागातून घराच्या दिशेनं जाणाऱ्या काही लोकांना ही घटना घडल्याचं लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ वडगाव जंगल पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय पोलिसांनी मृत गजाननचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.