मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rananjay Singh : प्रवचन देताना आला हार्ट अटॅक, प्राध्यापकाचा स्टेजवरच मृत्यू; पाहा व्हिडिओ

Rananjay Singh : प्रवचन देताना आला हार्ट अटॅक, प्राध्यापकाचा स्टेजवरच मृत्यू; पाहा व्हिडिओ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 23, 2022 10:40 AM IST

Viral Video On Social Media : प्राध्यापक रणंजय सिंह यांना जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा ते लोकांना प्रवचन देत होते. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

professor rananjay singh passed away
professor rananjay singh passed away (HT)

professor rananjay singh passed away : मारुती मानस मंदिरचे प्रमुख आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक रणंजय सिंह यांचं हार्ट अटॅकनं निधन झालं आहे. ते स्टेजवरून लोकांना प्रवचन देत होते तेव्हा त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरस्टेजवर बोलताना प्राध्यापकाचा मृत्यू झाल्यानं बिहारच्या छपरा जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक रणंजय सिंह हे बिहारच्या छपरामध्ये एका कार्यक्रमात लोकांना प्रवचन देत होते. त्यावेळी त्यांना काहीसं अस्वस्थ वाटू लागल्यानं ते स्टेजवरच कोसळले. तिथं उपस्थित असलेल्या लोकांना सुरुवातीला त्यांना हार्ट अटॅक आल्याचं समजलं नाही. याशिवाय खाली बसलेल्या लोकांना नेमकं काय झालंय, हे ही कळलं नाही.

परंतु ते काहीच बोलू न लागल्यानं लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. रणंजय सिंह हे बिहारमधील धार्मिक आणि शैक्षणिक विषयांचे मोठे जाणकार मानले जात होते. त्यांचं वय ८० पेक्षा जास्त होतं. त्यामुळं आता त्यांच्या निधनानं बिहारमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point