मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Coal Mine Scam : दर्डा पित्रा-पुत्रांना चार वर्षांची शिक्षा; कोळसा खाण घोटाळा प्रकरणात कोर्टाचा निकाल

Coal Mine Scam : दर्डा पित्रा-पुत्रांना चार वर्षांची शिक्षा; कोळसा खाण घोटाळा प्रकरणात कोर्टाचा निकाल

Jul 26, 2023, 03:24 PM IST

  • vijay darda news today : माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे चिंरजीव देवेंद्र दर्डा यांना कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Vijay Darda has been sentenced to four years by the cbi court (HT)

vijay darda news today : माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे चिंरजीव देवेंद्र दर्डा यांना कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

  • vijay darda news today : माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे चिंरजीव देवेंद्र दर्डा यांना कोर्टाने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Coal mine allocation scam : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात कोर्टाने माजी खासदार आणि लोकमत वृत्तसमुहाचे प्रमुख विजय दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा यांनादेखील चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात दर्डा पित्रापुत्रांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. दर्डा पितापुत्रांवर चुकीच्या पद्धतीने खाणीचं कंत्राट मिळवण्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात आला होता. जेएलडी यवतमाळ या कंपनीला कंत्राट मिळालं होतं, जी कंपनी दर्डा यांच्या मालकीची होती. त्यानंतर आता कोर्टाने विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपाचं कंत्राट जेएलडी यवतमाळ या कंपनीला देण्यात आलं होतं. कोळसा घोटाळा प्रकरणात गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप विरोधकांकडून माजी खासदार विजय दर्डा यांच्यावर करण्यात आला होता. देशभरात गाजलेल्या कोळसा घोटाळा प्रकरणात देशातील अनेक बड्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या घोटाळ्याचा तपास सुरू झाल्यानंतर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. तसेच राजकीय नेत्यांचीही चौकशी करण्यात आली होती. आरोपींमध्ये आएएस अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव आणि उच्चभ्रू दलालांचा समावेश असल्याचा दावा करण्याता आला होता.

विजय दर्डांचा कोर्टात दावा काय?

कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात दिल्लीतील विशेष सीबीआय कोर्टाने माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा यांना दोषी ठरवलं. तसेच शिक्षा सुनावण्याची तारीखही ठरवून टाकली. त्यावेळी 'गेल्या ९ वर्षात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आम्ही खूप यातना सोसल्या आहे, त्यामुळं आम्हाला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी', असा युक्तिवाद दर्डा यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. परंतु कोर्टाने आता दर्डा पितापुत्रांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विजय दर्डा हे लोकमत वृत्तसमुहाचे प्रमुख असून ते काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते.

पुढील बातम्या