मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Coronavirus new cases : देशात पुन्हा करोनाचा उद्रेक; एका दिवसात ३ हजार रुग्ण वाढले!

Coronavirus new cases : देशात पुन्हा करोनाचा उद्रेक; एका दिवसात ३ हजार रुग्ण वाढले!

Mar 30, 2023, 11:48 AM IST

  • Covid 19 New Cases : करोना हद्दपार झाला असं वाटत असतानाच देशात पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे. 

Covid 19

Covid 19 New Cases : करोना हद्दपार झाला असं वाटत असतानाच देशात पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे.

  • Covid 19 New Cases : करोना हद्दपार झाला असं वाटत असतानाच देशात पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे. 

Coronavirus in India : वर्षभराच्या अंतरानंतर करोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत देशभरात करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असून काल एका दिवसात ३ हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

मागच्या २४ तासांत देशात ३०१६ नवे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे एका दिवसात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं करोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १३ हजार ५०९ झाली आहे. काल एका दिवसात ६ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नव्या आकडेवारीसह देशातील आतापर्यंतच्या करोना बाधितांची संख्या ४ कोटी ४१ लाख ६९ हजार ९४१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५ लाख ३० हजार ८६२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनाचा रोजच्या संसर्गाचा दर २.७ टक्के आणि आठवड्याचा संसर्गाचा दर १.७१ टक्के नोंदवण्यात आला आहे. याआधी एका दिवसात२१५१ नवीन रुग्ण आढळले होते.

दिल्ली सरकार अलर्ट मोडवर

राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यामुळं दिल्ली सरकार सावध झालं आहे. कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्ली सरकार गुरुवारी बैठक घेणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी ही बैठक बोलावली असून, या बैठकीला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सरकारी रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत गेल्या वर्षी ३१ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच करोना संसर्गाची ३०० च्या वर गेल्यामुळं ही बैठक बोलावण्यात आली आहे.

विभाग

पुढील बातम्या