मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Corona JN.1 Virus : सावधान! कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जाऊ शकतो तुमच्या घशातील आवाज; नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

Corona JN.1 Virus : सावधान! कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जाऊ शकतो तुमच्या घशातील आवाज; नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा

Dec 24, 2023, 07:40 AM IST

    • Corona JN.1 Virus : कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनानात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे तोंडाची चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे आवाजही जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.
coronavirus_main

Corona JN.1 Virus : कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनानात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे तोंडाची चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे आवाजही जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

    • Corona JN.1 Virus : कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनानात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे तोंडाची चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे आवाजही जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

Corona JN.1 Virus : कोरोनाचा JN 1 या नव्या विषाणूने जगभरात चिंता वाढवली आहे. केवळ चीन-सिंगापूरच नाही तर आता भारतातूनही या विषाणूने बाधित अनेक नागरीक आढळत आहेत. हा संसर्ग वेगाने पसरत आहे. आतापर्यंत केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागांमध्ये या विषाणूने बाधित नागरीक आढळले आहेत. Omicron च्या JN.1 या नवीन सब-व्हेरियंटमुळे कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. कोरोनासंदर्भातील ताज्या संशोधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. संशोधात असे आढळून आले आहे की या धोकादायक विषाणूमुळे केवळ चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. एका १५ वर्षांच्या मुलीचा आवाज कोरोना विषाणूमुळे गेल्याचे संशोधनात आढळले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending news : प्रेमासाठी कायपण! महिला पोलीस निरीक्षक हवालदारासोबत गेली पळून, निवडणूक ड्युटीदरम्यान जुळले सूत!

Fact Check : रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र पंतप्रधान मोदींनी उलटं धरलं? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Fact Check : अखिलेश यादव यांच्यावर रोड शो दरम्यान बूट व चप्पला फेकल्या की हार अन् फुले?

Viral Video : मुक्या प्राण्याला क्रूर वागणूक! पाळीव कुत्र्याला केअरटेकरची लिफ्टमध्ये बेदम मारहाण

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वाहनांनी कोंडला! बोरघाटात तब्बल १० किमी रांगा; पुण्याकडील वाहतूक रखडली

काही बालरोगशास्त्र तज्ञांनी SARS-CoV-2 infection यावर संशोधन केले असून यात नव्या विषाणूने बाधित कोरोना रुग्णांमध्ये घशातही संसर्ग होत असल्याचे आढळले. याचा रुग्णाच्या थेट आवाजावर परिमाण होत असल्याचे आढळेल आहे. वैद्यकीय भाषेत याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस संबोधले गेले आहे.

Webb telescope : वेब टेलिस्कोपने २०२३ मध्ये टिपलेले खास छायाचित्र; ज्यांनी घडवला वेळेचा प्रवास, पाहा फोटो

जीएनसीटीडी मंत्री (आरोग्य) सौरभ भारद्वाज यांनी नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियासह श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर रोजी श्वसन औषध तज्ञांसोबत बैठक बोलावली होती. ज्यामध्ये RT PCR द्वारे न्यूमोनियाच्या गंभीर प्रकरणांची चाचणी करणे, नमुन्यांचा तपशील ठेवणे तसेच अँटी-व्हायरल औषधांचा पुरेसा साठा राखणे यावर काही नियमावली जारी केली होती. यामध्ये १३ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत सर्व रूग्णालयांमध्ये विविध बाबींवर तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिल देखील घेण्यात आले.

कोरोनाचा धोका पाहता २० डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही सर्व आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावत दर तीन महिन्यांनी कोविड चाचण्या आणि हॉस्पिटल्सच्या मॉक ड्रिल घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच आतापासून आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

विभाग

पुढील बातम्या