Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वाहनांनी कोंडला! बोरघाटात तब्बल १० किमी रांगा; पुण्याकडील वाहतूक रखडली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वाहनांनी कोंडला! बोरघाटात तब्बल १० किमी रांगा; पुण्याकडील वाहतूक रखडली

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वाहनांनी कोंडला! बोरघाटात तब्बल १० किमी रांगा; पुण्याकडील वाहतूक रखडली

Published Dec 24, 2023 06:38 AM IST

Mumbai Pune Expressway heavy traffic jam : पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तब्बल १० किमी रांगा लागल्या आहे. रात्रभर ही कोंडी कायम होती.

Mumbai Pune expressway highway traffic
Mumbai Pune expressway highway traffic

Mumbai Pune expressway highway traffic news : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर शनिवारी सकाळपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी ही रात्री देखील कायम होती. अडोशी टनेलच्या आधीपासून ते अमृतांजन पुलापर्यंत तर पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे १० किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जुन्या मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटात अनेक वाहने बंद पडल्याने तर वाहतूक कोंडीत मोठी भर पडली.

Mumbai Pune expressway highway traffic
Mumbai Pune expressway highway traffic

नाताळ सन आणि विकेंडमुळे सलग तीन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यंटक लोणावळा आणि कोकणात गेल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सकाळ पासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून मार्गावर चार ते पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुले प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, ही कोंडी संध्याकाळ नंतर आणखीनच वाढली.

Mumbai Pune expressway highway traffic
Mumbai Pune expressway highway traffic

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात १० किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात रखडली आहे. बोरघाटात अनेक वाहने बंद पडली असून त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. जुन्या मुंबई पुणे मार्गांवर देखील हीच परिस्थिती होती. शिंग्रोबाच्या अलीकडे पासून रस्त्यातच वाहने बंद पडली आहेत. या वाहतूक कोंडीत महिला, लहान मुले अडकून पडल्याने अनेक नागरीक हे कंटाळून रस्तावर येऊन बसले होते. काही प्रवासी तर टोविंग वॅन, मेकॅनिकच्या प्रतीक्षेत महामार्गावरच उभे आहेत.

Mumbai Pune expressway highway traffic
Mumbai Pune expressway highway traffic

सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी

शनिवार व रविवारला जोडून तसेच ख्रिसमस सुट्टी आल्याने सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. शनिवारी सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी होती. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाका व खंडाळा घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा गागल्या होत्या. खंडाळा घाटात अनेक वाहने गरम होऊन बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

सुट्ट्या आल्या की एक्सप्रेसवे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. हे समीकरण नित्याचेच झाले आहे. यामुळे कार आणि अवजड वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने ही कोंडी होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पुढील तीन दिवस या मार्गाने प्रवास करतांना दुपारी बारानंतर अवजड आणि मोठ्या वाहनांनी दुपारी १२ नंतर प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर