मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘तेरे नाम’मधलं सलमान खान… सतत रडणारं पात्र… प्रियंका गांधींचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘तेरे नाम’मधलं सलमान खान… सतत रडणारं पात्र… प्रियंका गांधींचा टोला

Nov 15, 2023, 09:44 PM IST

    • 'देशाचे पंतप्रधान प्रचार सभांमधून कायम स्वतःचंच दुःख मांडत असतात. ते सतत रडतच असतात. ‘तेरे नाम’ सिनेमात सलमान खान सुरुवातीपासून शेवटपर्यंत रडत असतो. असा टोला प्रियंका गांधींनी लगावला.
Congress General Secretary Priyanka Gandhi addresses a public meeting for the Madhya Pradesh assembly elections, in Datia on Wednesday. (ANI Photo) (Congress Twitter)

'देशाचे पंतप्रधान प्रचार सभांमधून कायम स्वतःचंच दुःख मांडत असतात. ते सतत रडतच असतात. ‘तेरे नाम’ सिनेमात सलमान खान सुरुवातीपासून शेवटपर्यंत रडत असतो. असा टोला प्रियंका गांधींनी लगावला.

    • 'देशाचे पंतप्रधान प्रचार सभांमधून कायम स्वतःचंच दुःख मांडत असतात. ते सतत रडतच असतात. ‘तेरे नाम’ सिनेमात सलमान खान सुरुवातीपासून शेवटपर्यंत रडत असतो. असा टोला प्रियंका गांधींनी लगावला.

मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेसदरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदास चुरस लागली आहे. काल, मंगळवारी बैतूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मुर्खो के सरदार’ म्हणून हिणवलं होतं. तर आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दातिया येथे प्रचार सभेत पंतप्रधान मोदींवर पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला. प्रियांका गांधी म्हणाल्या, 'देशाचे पंतप्रधान प्रचार सभांमधून कायम स्वतःचंच दुःख मांडत असतात. मागे कर्नाटकात निवडणुकीदरम्यान त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची एक लांबलचक यादी वाचून दाखवली होती. असं दिसतं की ते सतत रडतच राहतात… रोते ही रहते है… तुम्ही बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'तेरे नाम' सिनेमा पाहिला आहे का? त्या सिनेमात सलमान खान सुरुवातीपासून शेवटपर्यंत रडत असतो. मी पंतप्रधान मोदींवर एक चित्रपट बनवण्याचा सल्ला देईन. त्या चित्रपटाचे नाव ‘मेरे नाम’ असं ठेवायला हवं' असं टोमणा प्रियंका गांधी यांनी मारला. प्रचारसभांमध्ये येऊन नुसतं रडणारे मोदी हे मी पाहिलेले देशाचे पहिले पंतप्रधान आहेत.' असं प्रियंका म्हणाल्या.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

भारतीय जनता पक्षाचे नेते जरा ‘विचित्र’ असल्याचं प्रियंका यावेळी भाषणात म्हणाल्या. पंतप्रधान जनतेची दु:ख ऐकून घेण्याऐवजी ते इथे येऊन त्यांच्याच समस्या सांगत असतात, असा टोला लगावला.

मध्य प्रदेशात प्रचाराचे सूप वाजले; १७ ला मतदान

मध्य प्रदेशातील २३० विधानसभा मतदारसंघात १७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मध्य प्रदेशात ५ कोटी ६० लाख ६०,९२५ मतदार असून शुक्रवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ दरम्यान मतदान पार पडणार आहे. मध्य प्रदेशात भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचाराची धुरा होती. पंतप्रधान मोदी यांनी ९ वेळा मध्य प्रदेशात जाऊन एकूण १४ प्रचारसभा घेतल्या. प्रचंड चुरशीच्या या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा झाल्या. तर कॉंग्रेसकडून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी प्रचारसभांना संबोधित केले. कॉंग्रेसकडून प्रचारादरम्यान जात जनगणनेचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. तसेच मध्य प्रदेशात वाढत असलेली बेरोजगारी, महागाई आणि राज्यात प्रचलित ‘५० टक्के कमिशन’चा मुद्दा मांडण्यात आला.

पुढील बातम्या