मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Priyanka Gandhi : पंतप्रधान मोदींनी पाकिटात फक्त २१ रुपयेच दिले! प्रियंका गांधीच्या वक्तव्याने भाजप नेते संतापले

Priyanka Gandhi : पंतप्रधान मोदींनी पाकिटात फक्त २१ रुपयेच दिले! प्रियंका गांधीच्या वक्तव्याने भाजप नेते संतापले

Oct 27, 2023, 10:50 AM IST

    • Priyanka Gandhi on PM Modi : कॉँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली असून यामुळे भाजपनेते चांगलेचे संतापले आहेत.
Priyanka Gandhi

Priyanka Gandhi on PM Modi : कॉँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली असून यामुळे भाजपनेते चांगलेचे संतापले आहेत.

    • Priyanka Gandhi on PM Modi : कॉँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली असून यामुळे भाजपनेते चांगलेचे संतापले आहेत.

Priyanka Gandhi on PM Modi : कॉँग्रेसनेत्या प्रियंका गांधी या राजस्थान येथील दौसा दौऱ्यावर असतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. गांधी यांच्या वक्तव्यामुळे भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. प्रियांका गांधी म्हणाल्या की, जेव्हा पंतप्रधान मोदींनी मंदिराला दिलेल्या देणगीचा लिफाफा उघडला तेव्हा त्यात फक्त २१ रुपये आढळले. प्रियंका गांधी यांच्या या टीकेमुळे भाजपनेते निवडणूक आयोगाकडे गेले असून त्यांनी गांधी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटिस बजावली असून उत्तर देण्यास सांगितले आहे.  

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Israel Hamas War: हमास-इस्त्रायल युद्धात अमेरिकेची उडी! सीरियावर केला भीषण एयर स्ट्राईक, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी ?

प्रियांका गांधी राजस्थानच्या दौसा येथे प्रचार दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांची येथे जाहीर सभा देखील झाली. या सभेत भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. गांधी म्हणाल्या की, जेव्हा पंतप्रधान मोदींनी मंदिराला दिलेल्या देणगीचा लिफाफा उघडला तेव्हा त्यात फक्त २१ रुपये आढळले. तुम्ही ते पाहिलंच असेल. मी ते टीव्हीवर पाहिले आहे, हे खरे आहे की नाही हे माहित नाही. पण, पीएम मोदी बहुधा देवनारायणजींच्या मंदिरात गेले असावेत. त्यानी दानपेटीत लिफाफा घातला. ६ महिन्यांनंतर, जेव्हा मी पंतप्रधान मोदींनी दान केलेला लिफाफा उघडला तेव्हा त्यात फक्त २१ रुपये आढळले. देशात देखील होत आहे. मंचावर उभे राहून देशात घोषणा देताना अनेक लिफाफे दाखवले जात आहेत. जेव्हा तुम्ही लिलाफे उघडता तेव्हा निवडणूक ही संपलेली असते.

Pratap Patil: खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या गाडीची तोडफोड! गावबंदी असूनही प्रवेश केल्यानं मराठा आंदोलक आक्रमक

निवडणूक आयोगाची प्रियंका गांधी यांना नोटिस

प्रियांका गांधी यांनी केलेल्या या टिकेविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यांनी प्रियांका गांधींच्या भाषणाचा व्हिडिओही निवडणूक आयोगाला दिला आहे. प्रियांका गांधी यांनी मोदी यांच्यावर केलेली ही टीका आचार संहितेचा भंग आहे, असे भाजपने म्हटले आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाकडे प्रियांकांना नोटीस बजावली आहे. प्रियंका गांधी यांना ३० ऑक्टोबरपर्यंत या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. राजस्थान येथे विधान सभेच्या २०० जागांसाठी निवडणुका सुरू आहेत. २५ नोव्हेंबरला या साठी मतदान होणार आहे. याचा निकाल हा ३ डिसेंबरला लागणार आहे.

विभाग

पुढील बातम्या