America Entry in Israel Hamas War: इस्रायल-हमास युद्धात आता अमेरिकेने उडी मारली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने सीरियावर भीषण हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी पूर्व सीरियामध्ये इराण समर्थित दहशतवादी गटांवर हल्ले केले असून यात अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या दहशतवादी गटांनी अलीकडेच इराक आणि सीरियामधील अमेरिकन सैन्यावर मोठ्या प्रमाणात रॉकेट आणि ड्रोन हल्ले केले होते. पेंटागॉनच्या अहवालानुसार या हल्ल्यांमध्ये २१ हून अधिक अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. सीरियावरील हा हवाई हल्ला त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन म्हणाले, "आज, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सूचनेनुसार, अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि त्यांच्या विरोधात हवाई हल्ले सुरू केले आहे. पूर्व सीरियातील दहशतवाद्यांच्या तळांवर आम्ही हल्ला करण्यात आला आहे. १७ ऑक्टोबरपासून इराण-समर्थित मिलिशिया गटांकडून इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर सुरू असलेल्या हल्ल्यांना हे प्रत्युत्तर आहे," असे ऑस्टीन म्हणाले.
ते म्हणाले, "अमेरिकन सैन्याची सुरक्षा ही राष्ट्राध्यक्षांसाठी पहिले प्राध्यान आहे. अमेरिका असे हल्ले सहन करणार नाही. त्यामुळे बायडेन यांनी कारवाईचे निर्देश दिले. आम्ही आमच्या सैन्याचे आणि आमच्या हिताचे रक्षण करू असे देखील बायडेन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या हवाई हल्ल्यामुळे इराण भडकण्याची शक्यता असून त्यांच्याकडून देखील हल्ले करण्याची शक्यता आहे. इराणने अलीकडेच हमास इस्रायल युद्धात उतरण्याची धमकी दिली होती. आता अमेरिकेच्या हवाई हल्ल्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या