मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress News : मोठी बातमी! इन्कम टॅक्स विभागानं गोठवली काँग्रेसची बँक खाती, लाइट बिल भरायलाही पैसे नाहीत!

Congress News : मोठी बातमी! इन्कम टॅक्स विभागानं गोठवली काँग्रेसची बँक खाती, लाइट बिल भरायलाही पैसे नाहीत!

Feb 16, 2024, 03:15 PM IST

  • IT Dept freeze Congress Bank Accounts : इन्कम टॅक्स विभागानं काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

Congress alleges its bank accounts frozen

IT Dept freeze Congress Bank Accounts : इन्कम टॅक्स विभागानं काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

  • IT Dept freeze Congress Bank Accounts : इन्कम टॅक्स विभागानं काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

IT Dept freeze Congress Bank Account: देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची बँक खाती प्राप्तिकर विभागानं गोठवली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन आज ही माहिती दिली. 'काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेले चेक पास केले जात नसून पक्षाला आलेले चेकही खात्यात जमा करण्यास बँका नकार देत आहेत. बँकांच्या या भूमिकेनंतर आम्ही केलेल्या चौकशीनुसार युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खातीही सील करण्यात आली आहेत, असं माकन म्हणाले.

लोकशाहीच गोठवली गेली आहे!

'निवडणूक घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हा लोकशाही गोठवण्याचा प्रकार आहे, असा घणाघात माकन यांनी केला. आयकर विभागानं युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला २१० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. क्राउडफंडिंगच्या माध्यमातून पक्षाला मिळालेला निधी गोठवण्यात आला आहे, असं माकन म्हणाले.

‘काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यासाठी देण्यात आलेलं कारणही हास्यास्पद आहे. २०१८-१९ च्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आज २०२४ सुरू आहे. आम्हाला रिटर्न फाइल करायला थोडा उशीर झाला म्हणून २१० कोटींची भरपाई मागण्यात आली आहे. कारवाईची वेळ पाहिली तर यामागचा हेतू सहज स्पष्ट होतो, असं माकन म्हणाले.

'काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यात असलेला पैसा धनाढ्यांचा, उद्योगपतींचा नाही. हे सगळे पैसे पक्षाच्या सदस्य नोंदणीचे, ऑनलाइन पेमेंटद्वारे पक्षाला मिळालेले आहेत. शंभर, दोनशे रुपये लोकांनी यूपीआयच्या माध्यमातून जमा केलेले आहेत. लपूनछपून जमवलेला हा पैसा नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवलेल्या निवडणूक रोख्यातून जमवलेले हजारो कोटी भाजप खर्च करत आहे. कुठं राहिलीय देशात लोकशाही?,’ असा सवाल माकन यांनी केला.

भारत जोडो न्याय यात्रेवर परिणाम होणार?

पक्षाकडं सध्या खर्च करण्यासाठी, बिलं भरण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी निधीची कमतरता आहे. या कारवाईचा सर्व गोष्टींवर परिणाम होईल, केवळ न्याय यात्राच नाही तर सर्व राजकीय कार्यक्रमांवर परिणाम होणार आहे, अशी भीती अजय माकन यांनी केली.

‘आपल्या लोकशाही फक्त एकच राजकीय पक्ष राहणार का? सर्व विरोधी पक्षांचे अकाऊंट फ्रीज केले जाणार का? इतर पक्षांना कुठलाही अधिकार राहणार नाही का?,’ असा सवालही अजय माकन यांनी केला.

 

विभाग

पुढील बातम्या