मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  व्हॅलेंटाईनला कंडोम आणि मेणबत्तीची सर्वाधिक विक्री; आकडे पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

व्हॅलेंटाईनला कंडोम आणि मेणबत्तीची सर्वाधिक विक्री; आकडे पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

Feb 15, 2023, 08:39 PM IST

    • Valentine Day Condom Sale : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्हॅलेंटाईन्सला विक्री झालेल्या कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय मेणबत्तीनंही मार्केट मारलं आहे.
Valentine Day Condom Sale In India (HT)

Valentine Day Condom Sale : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्हॅलेंटाईन्सला विक्री झालेल्या कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय मेणबत्तीनंही मार्केट मारलं आहे.

    • Valentine Day Condom Sale : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्हॅलेंटाईन्सला विक्री झालेल्या कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय मेणबत्तीनंही मार्केट मारलं आहे.

Valentine Day Condom Sale In India : व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी अनेक कपल्स एकमेकांना गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करत असतात. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपुरसह देशातील अनेक शहरांमध्ये यंदाचा व्हॅलेंटाईन जोरात साजरा करण्यात आला आहे. परंतु यंदाच्या व्हॅलेंटाईनला गुलाब किंवा गिफ्ट्स नाही तर चक्क कंडोम आणि मेणबत्त्यांची दणक्यात विक्री झाली आहे. त्याचे आकडेही आता समोर आलेले आहेत. त्यामुळं आता या वस्तूंच्या विक्रीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळं प्रेमीयुगुलांना व्हॅलेंटाईन साजरा करता आलेला नव्हता. परंतु यंदा कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आल्यामुळं अनेकांनी व्हॅलेंटाईन्स दणक्यात साजरं केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RTOमध्ये जाऊन आता वाहन परवण्यासाठी परीक्षा देण्याची गरज नाही; ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सरकारची नवी नियमावली

Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

Viral News : पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवत होता १७ वर्षीय रॅपर, गोळी झाडली गेल्याने अचानक मृत्यू

Viral Video : आंबा पाण्यात न भिजवता खाताय? लगेच सावध व्हा! हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल!

वस्तूंची ऑनलाईन डिलीव्हरी देणारी कंपनी ब्लिंकीटचे संस्थापक अलबिंदर ढींडसा यांनी याबाबतची माहिती शेयर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत व्हॅलेंटाईनला कंडोमच्या विक्रीत तब्बल २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. व्हॅलेंटाईनला केवळ कंडोमचीच नाही तर मेणबत्त्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यानंतर डिओडोरेंट, परफ्यूम, पुष्पगुच्छ आणि चॉकलेट्सची विक्री झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. फूटस्टर्फच्या रिपोर्ट्सनुसार, व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाचं फुल किंवा गिफ्ट्सपेक्षा कंडोमची सर्वात जास्त विक्री झालेली आहे.

व्हॅलेटाईन्सला तरुणाईमध्ये मोठा उत्साह असल्याचं पाहायला मिळतं. योगायोगानं व्हॅलेंटाईनच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ फेब्रुवारीला जागतिक कंडोम दिनही साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये कंडोमची मोठ्या प्रमाणात विक्री होण्यासाठी अनेक कंडोम कंपन्या मोठ्या ऑफर्स देत असतात, त्यामुळं यंदाच्या व्हॅलेंटाईनला कंडोमची विक्री वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुढील बातम्या