व्हॅलेंटाईनला गल्लीतील पोरासोबत सेक्स करताना पडकलं; संतापलेल्या पतीनं पत्नीला कायमचं संपवलं
Shivpuri Crime News : व्हॅलेंटाईनच्या दिवशी पत्नीला दुसऱ्या तरुणासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीनं तिची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Shivpuri Madhya Pradesh Murder Case : लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या तरुणासोबत व्हॅलेंटाईनडे साजरा करणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. कारण बॉयफ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन साजरा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी पतीनं आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरीत ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला तातडीनं अटक केली आहे. भारतासह संपूर्ण देशभरात व्हॅलेटाईन डे साजरा केला जात असताना आता विवाहबाह्य संबंधातून शिवपुरीत एका महिलेची हत्या करण्यात आल्यामुळं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शिवपुरीच्या शुमैला शिवारात राहणाऱ्या राम कृष्ण केवट याची पत्नी आशाचं गेल्या काही दिवसांपासून गल्लीतील तरुणासोबत अफेयर सुरू होतं. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. परंतु तरीदेखील आशा आपल्या पतीविरोधात जाऊन तरुणासोबत वेळ घालवत होती. व्हॅलेंटाईन वीक असल्यामुळं राम केवटची पत्नी आशा ही तरुणाला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी रामने तिच्यावर नजरच ठेवली. त्यावेळी आशा ही दुसऱ्या तरुणासोबत त्याच्या घरात सेक्स करत असल्याचं आरोपी रामच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यानं पत्नी आणि दुसऱ्या तरुणाला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर संतापलेल्या आरोपी राम केवटनं धारदार शस्त्रांनी वार करत पतीची हत्या केली. तर तिच्या पतीसोबत सेक्स करणारा तरुण घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
विवाहबाह्य संबंधाच्या कारणावरून आपल्याच पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी राम केवटने रक्तानं माखलेलं हत्यार घेऊन बदरवास पोलीस ठाणे गाठलं. घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगत हत्येची कबुलीही दिली. आरोपीनं हत्या केल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर हत्येची पृष्टी झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी राम केवटवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.