मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime News : भाजप खासदाराला व्यापाऱ्यानं लावला तीन कोटींचा चुना; पोलिसांत तक्रार दाखल

Crime News : भाजप खासदाराला व्यापाऱ्यानं लावला तीन कोटींचा चुना; पोलिसांत तक्रार दाखल

Sep 28, 2022, 09:11 AM IST

    • UP Crime News : मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्यानं आपली सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत भाजप खासदारानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Gorakhpur UP Crime News (HT)

UP Crime News : मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्यानं आपली सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत भाजप खासदारानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    • UP Crime News : मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्यानं आपली सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत भाजप खासदारानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Gorakhpur UP Crime News : अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांची सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईती एका व्यापाऱ्यानं रवी किशन यांना गंडा घातल्यानंतर आता किशन यांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं आता एका भाजप खासदारालाच कोट्यवधींचा गंडा घातल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

big solar storm will hit earth : पृथ्वीवर धडकणार भीषण सौर वादळ! अनेक देश बुडणार अंधारात; काय होणार परिणाम

Covishield : कोविशिल्डच्या धोक्याबद्दल एस्ट्राझेनकाने २०२१ मध्येच सांगितलं होतं, सीरमने केला खुलासा

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही 'हे' काम

Elon Musk : अमेरिकन नागरिकांची भूमिका आलेली २०२४ची शेवटची निवडणूक! एलोन मस्क का म्हणाले असे ? वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार रवी किशन यांनी २०१२ साली मुंबईतील व्यापारी जितेंद्र जैन यांना ३.२५ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर खासदार रवी किशन यांनी आरोपी जितेंद्रला पैसे परत मागितले तेव्हा त्यानं ३४ लाखांचे १२ चेक दिले. परंतु किशन यांनी ते चेक एसबीआयच्या गोरखपूर शाखेत ते जमा केले असता ते चेक बाऊंस झाले. त्यामुळं त्यांनी आरोपी जितेंद्रला याबाबत माहिती विचारली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. रवी किशन यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रवी किशन यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच रवी किशन यांच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या आईंना कॅन्सर झाल्यामुळं त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळं अशा संकटकाळात रवी किशन यांची आर्थिक फसवणूक झाल्यानं खळबळ उडाली आहे.

विभाग

पुढील बातम्या