मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chhattisgarh Encounter : कांकेरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २९ नक्षली ठार!

Chhattisgarh Encounter : कांकेरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २९ नक्षली ठार!

Apr 16, 2024, 08:58 PM IST

  • Chhattisgarh Encounter : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २९ नक्षली ठार झाले असल्याचे वृत्त आहे. यातील १८ मृतदेह हाती लागले आहेत.

कांकेरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २९ नक्षली ठार झाले असल्याचे वृत्त आहे. यातील १८ मृतदेह हाती लागले आहेत.

  • Chhattisgarh Encounter : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २९ नक्षली ठार झाले असल्याचे वृत्त आहे. यातील १८ मृतदेह हाती लागले आहेत.

Chhattisgarh Encounter with Naxalites : छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. यापैकी १८ मृतदेह मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत टॉप नक्षली कमांडर शंकर राव आणि ललिताठार झाले आहेत. या दोघांवर प्रत्येकी २५-२५ लाख रुपयांचे बक्षीस होते.दरम्यान नक्षली राजूही ठार झाल्याचे वृत्त आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

बस्तर जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, कांकेरमधील छोटेबैठिया येथे ही चकमक झाली. घटनास्थळावरून १८ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. दरम्यान या चकमकीत तीन जवानही जखमी झाले आहेत. अजूनही शोध मोहीम सुरू आहे.चकमकीची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक पाठवली गेली. घटनास्थळावरून एके सीरीजच्या ७ रायफली व ३ लाइट मशीनगन हस्तगत करण्यात आल्या आहेत.

नक्षली लपल्याची मिळाली होती गोपनीय माहिती -

सुंदरराज यांनी सांगितले की, ही चकमक आतापर्यंत सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक आहे. नक्षलवादी शंकर, ललिता आणि राजू या जंगलात लपले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.

चकमकीत तीन जवीन जखमी -

या गोळीबारात सुरक्षा दलातील तीन जवानही जखमी झाले आहेत. यापैकी BSF च्या एका जवानाच्या पायात गोळी लागली आहे. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रायपूरला हलवले आहे. त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या कांकेरच्या जंगलात नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. या घटनेसह या वर्षी कांकेरसह बस्तर परिसरातील सात जिल्ह्यात सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या चकमकीत आतापर्यंत ६८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर येथील छोटेबैठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालपर जंगलात ही चकमक झाली. बीएसएफ आणि डीआरजी (जिल्हा राखीव जवान) कडून शोधमोहीम राबवली गेली. त्यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या जोरदार चकमकीत २९ नक्षली ठार झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत बीएसएफचा एक निरीक्षक आणि एक डीआरजी जवानासह तीन जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

पुढील बातम्या