मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

Mar 28, 2024, 03:55 PM IST

  • Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होत. मात्र या प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे.

 अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होत. मात्र या प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे.

  • Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होत. मात्र या प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे.

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. अटकेनंतरही केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवत आहेत, त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळून लावली आहे.  

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याबाबात दाखल याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुरजित सिंह यादव नावाच्या व्यक्तीने ही जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य प्रभारी न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.

या याचिकेत अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होत. मात्र या प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं मत न्यायालयानं नोंदवलं आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीकडून अटक होण्यापूर्वी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवला. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही. ते तुरुंगातून दिल्लीचा कारभार करत आहेत.

पुढील बातम्या