NIA DG : मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या हाती NIA ची धुरा! महाराष्ट्र एटीएसचे डीजी सदानंद दाते एनआयएचे नवे प्रमुख-ips sadanand vasant date appointed as director general of national investigation agency ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NIA DG : मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या हाती NIA ची धुरा! महाराष्ट्र एटीएसचे डीजी सदानंद दाते एनआयएचे नवे प्रमुख

NIA DG : मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या हाती NIA ची धुरा! महाराष्ट्र एटीएसचे डीजी सदानंद दाते एनआयएचे नवे प्रमुख

Mar 28, 2024 08:18 AM IST

IPS Sadanand Vasant Date NIA DG : महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

NIA DG: देशात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाला आहे. आशातच केंद्र सरकारने मोठी जबाबदारी महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याला दिली आहे. १९९० च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे धडकाकेबाज आयपीएस अधिकारी अधिकारी सदानंद वसंत दाते (IPS Sadanand Vasant Date) यांच्या खांद्यावर आता केंद्रीय तपास संस्था (NIA) ची धुरा देण्यात आली आहे. सदानंद दाते यांच्यासह आणखी दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तपास यंत्रणात नियुक्त्या करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत.

विजय शिवतारेंची पवार विरोधाची तलवार म्यान? एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत दिलजमाई

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) NIA च्या महासंचालक (DG) या पदावरील नियुक्तीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ हा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत राहणार आहे. सदानंद दाते हे दिनकर गुप्ता यांची जागा घेतील, जे ३१ मार्च रोजी निवृत्त होणार आहेत.

Viral News : दारू पिऊन पायलटने केले विमानाचे उड्डाण; प्रवाशांचा जीव टांगणीला! एअर इंडियानं केलं निलंबित

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राजस्थान केडरच्या १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार शर्मा यांची पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. शर्मा बालाजी श्रीवास्तव यांची जागा घेणार आहेत, ज्यांचा कार्यकाळ मार्चच्या अखेरीस पूर्ण होणार आहे.

पीयूष आनंद हे एनडीआरएफचे नवे प्रमुख असतील

पीयूष आनंद हे एनडीआरएफचे नवे प्रमुख राहणार आहेत. आनंद हे उत्तर प्रदेश केडरच्या १९९१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) विशेष महासंचालक आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी एनडीआरएफचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आनंद अतुल करवाल यांची जागा घेतील, जे ३१ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. तर केरळ केडरचे १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी एस सुरेश यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात अकोला ठरले सर्वात हॉट! पारा ४२ अंशांवर; महिना अखेर विदर्भात पावसाचा इशारा

२६/११ च्या हल्ल्यात मोठी कामगिरी

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबई शहरावर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला. तेव्हा आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे अशा काही अधिकाऱ्यांमध्ये होते, जे अतिरेक्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचले तसेच त्यांच्या सोबत त्यांनी शेवट पर्यंत लढा दिला. या हल्ल्यात दाते यांचं धैर्य, शौर्य आणि आपत्तीच्या कठीण परिस्थिती हातळण्याच्या समजूतदारपणा देखील दिसला. त्यांच्या शौर्यामुळे अबू इस्माईल आणि अजमल कसाब यांनी ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यात यश आले. दोन दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या कसाबला जिवंत पकडण्यात यश आले. २६/११ च्या हल्ल्यात दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.

कोण आहेत सदानंद दाते ?

मारठमोळे आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत आहेत. या काळात त्यांनी विविध पदांवर जबाबददारी सांभाळली. त्यांनी त्यांच्या अनुभव्यवर 'वर्दीतील माणसांच्या नोंदी' हे पुस्तक देखील लिहिले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पहिले होते. यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयएएस, आयपीएस आणि IA&AS असे तीन पर्याय त्याच्या पुढे होते. मात्र, सदानंद दातेंनी आयपीएस हा पर्याय निवडला व पोलीस खात्यात भारती झाले. सदानंद दाते हे सध्या महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख आहेत. त्यांची आता एनआयएचे डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पूर्वी त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी तर केंद्रीय राखीव पोलीस दलात आयजी (ऑप) म्हणूनही काम केले आहेत मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांचं पोलीस आयुक्तदेखील ते राहिले आहेत.