मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ambedkar Jayanti 2023 : आकाशातल्या ताऱ्यालाही आता बाबासाहेबांच्या नावाचं कोंदण!

Ambedkar Jayanti 2023 : आकाशातल्या ताऱ्यालाही आता बाबासाहेबांच्या नावाचं कोंदण!

Apr 12, 2023, 10:09 AM IST

  • star named after dr babasaheb ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या लाखो अनुयायांना एक अनोखी भेट मिळाली आहे. बाबासाहेबांचं नाव आता आकाशातल्या एका ताऱ्याला देण्यात आलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (हिंदुस्तान टाइम्स)

star named after dr babasaheb ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या लाखो अनुयायांना एक अनोखी भेट मिळाली आहे. बाबासाहेबांचं नाव आता आकाशातल्या एका ताऱ्याला देण्यात आलं आहे.

  • star named after dr babasaheb ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या लाखो अनुयायांना एक अनोखी भेट मिळाली आहे. बाबासाहेबांचं नाव आता आकाशातल्या एका ताऱ्याला देण्यात आलं आहे.

Dr. Ambedkar Jayanti 2023 : बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या म्हणजेच १४ एप्रिल २०२३ साली देशभरात उत्साहात साजरी होईल. भीमरावांचं नाव संपूर्ण देश आदराने आणि आनंदाने घेईल. देशाचे घटनाकार म्हणून भीमराव आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं. याशिवाय बॅरिस्टर, शोषित जनांचे नेते, मूकनायक अशा अनेक अंगांनी बाबासाहेबांची ओळख जगाला परिचित आहे. आता बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या एका अनुयायाने थेट आकाशातल्या एका ताऱ्याचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं ठेवावं अशी मागणी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या अमेरिकेतल्या संस्थेला केली. महत्वाचं म्हणजे ही मागणी मान्यही झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

Viral News: पोटच्या ३ वर्षाच्या मुलीला कारमध्येच विसरले; २ तासानंतर पालकांच्या लक्षात आलं, तोपर्यंत…

Madhavi Raje Scandia : राजमाता माधवी राजे सिंधिया यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अनेक नेते उपस्थित

kozhikode hospital news : बोटाचं ऑपरेशन करायचं होतं, जिभेचं करून टाकलं! सरकारी रुग्णालयात घडला हादरवून टाकणारा प्रकार

बाबासाहेबांच्या नावाने कसं ठेवलं गेलं आकाशातल्या ताऱ्याचं नाव?

बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन ६ डिसेंबर १९५६ साली झालं. त्यावेळेस त्यांच्या अंत्ययात्रेत लोटलेल्या तुफान जनसागराने बाबासाहेबांना अखेरचा निरोप देताना “जबतक सुरज चांद रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा”, अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र ही घोषणा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी प्रत्यक्षात आणायची असं ठरवलं आणि त्यांनी त्यादृष्टीने काम सुरू केलं.

सर्वात आधी त्यांनी आकाशातल्या ताऱ्यांना महापुरूषांची नावं देता येतात का याची पडताळणी केली. अशी नावं यापूर्वी देण्यात आली आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी एक रितसर ऑनलाईन अर्ज अमेरिकेतल्या इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेला केला. यासाठी शंभर डॉलर्स म्हणजे साधारणपणे नऊ हजार रूपये इतके पैसेही त्यांनी या संस्थेच्या रजिस्ट्रेशन फी साठी पाठवले.

९ फेब्रुवारी २०२३ रोजी राजू शिंदे यांनी केलेल्या या अर्जाला साधारणपणे एक महिन्यांनी उत्तर आलं आणि या संस्थेने आकाशातल्या एका ताऱ्याला बाबासाहेब आंबेडकर यांचंं नाव देत असल्याचं सांगितलं. 

त्यामुळे बाबासाहेबांचं नाव फक्त घोषणेपुरतं नाही तर ताऱ्याच्या रुपात प्रत्यक्षात राहाणार आहे. महत्वाचं म्हणजे हा तारा आपल्याला आपल्या मोबाईलवर पाहाता येणार आहे.

कसा पाहाल बाबासाहेबांच्या नावाचा तारा?

प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग नावाने अॅप डाऊनलोड करून घेता येईल. अॅपमध्ये गेल्यावर रजिस्ट्रीचा CX26529US हा क्रमांक टाकल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव आपल्याला पाहायला मिळू शकेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकर अनुयायांना राजू शिंदे यांनी ही अत्यंत सुंदर भेट दिली आहे. 

विभाग

पुढील बातम्या