मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : १० वीच्या परीक्षेत आला विश्वचषक २०२३ च्या फायनलमधील हा प्रश्न! देऊ शकाल का उत्तर?

Viral News : १० वीच्या परीक्षेत आला विश्वचषक २०२३ च्या फायनलमधील हा प्रश्न! देऊ शकाल का उत्तर?

Mar 12, 2024, 01:21 PM IST

    • ICC Cricket World Cup 2023 : गुजरात बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेत आयसीसी विश्वचषक 2023 च्या फायनलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अहवाल लिहिण्यास सांगण्यात आला. ज्याने हा सामना पाहिला असेल त्यालाच या प्रश्नाचे उत्तर देता येणार.
१० वीच्या परीक्षेत आला विश्वचषक २०२३ च्या फायनमधील हा प्रश्न

ICC Cricket World Cup 2023 : गुजरात बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेत आयसीसी विश्वचषक 2023 च्या फायनलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अहवाल लिहिण्यास सांगण्यात आला. ज्याने हा सामना पाहिला असेल त्यालाच या प्रश्नाचे उत्तर देता येणार.

    • ICC Cricket World Cup 2023 : गुजरात बोर्डाच्या १०वीच्या परीक्षेत आयसीसी विश्वचषक 2023 च्या फायनलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अहवाल लिहिण्यास सांगण्यात आला. ज्याने हा सामना पाहिला असेल त्यालाच या प्रश्नाचे उत्तर देता येणार.

ICC Cricket World Cup 2023 : भारताने आयोजित केलेला ICC क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धा संपून चार महिनेही उलटले नाहीत आणि त्यासंबंधीचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ लागले आहेत. सध्या गुजरात बोर्डाच्या सुरू असलेल्या १० वीच्या परीक्षेत क्रिकेट विश्वचषकाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला असून हा प्रश्न आता व्हायरल होतो आहे. १०वीच्या परीक्षेत वर्ल्ड कप २०२३ फायनलशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न सोपा होता, पण ज्यांनी अहमदाबादमध्ये खेळलेला हा सामना पाहिला नसेल त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे नक्कीच कठीण जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Rahul Gandhi In Maharashtra: भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात, नंदुरबार येथे होणार भव्य सभा

वास्तविक, गुजरात बोर्डाने इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेत विचारले की, तुम्ही अहमदाबाद येथे होणाऱ्या ICC विश्वचषक २०२३ च्या फायनलचे साक्षीदार आहेत. तुम्ही जो सामना पहिला असाल त्यावर आधारित तुमच्या निरीक्षणांवर सामन्याचा अहवाल लिहा. ज्यांनी सामना पाहिला असेल त्यांना या प्रश्नाचे उत्तर लिहिणे सोपे ठरले असते. मात्र, जे विद्यार्थी क्रिकेट पाहत नाही त्यांच्या त्यांच्यासाठी या सामन्यावरचा अहवाल लिहिणे कठीण झाले असेल. हा सामना अहमदाबादमध्ये झाला यामुळे हा प्रश्न गुजरात बोर्डाने १० वीच्या परीक्षेत विचारला असावा.

Mahayuti seat sharing : आरएसएसच्या 'त्या' आग्रहामुळं रखडलं महायुतीचं महाराष्ट्रातील जागावाटप?

सोप्या शब्दात सांगायचे तर वर्ल्ड कप २०२३ च्या फायनल सामणा हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. भारताने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत वर्ल्डकपचा मानकरी ठरला. कर्णधार पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाची ट्रॉफी मिळवून दिली. ट्रॅव्हिस हेडने अंतिम फेरीत शतक झळकावले. भारताचा संघ प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला.

विश्वचषक किंवा क्रिकेटशी संबंधित बहुतेक प्रश्न विचारल्यावर त्यावर उत्तरासाठी चार पर्याय दिले जातात. उदाहरणार्थ, २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण होता असे तुम्हाला विचारले जाऊ शकते. या साठी तुम्हाला रोहित शर्मा, विराट कोहली, पीट कमिन्स आणि मोहम्मद शमी सारखे पर्याय दिले गेले असते तर ते सोपे झाले असते, परंतु जर तुम्हाला अहवाल लिहायला सांगितले तर तुम्ही अडचणीत याल. कारण हा सामना प्रत्यक्ष पहिल्याशीवाय यावर अहवाल लिहिणे कठीण काम आहे.

पुढील बातम्या