Rahul Gandhi Bharat nyay yatra In Maharashtra: काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज राज्यात दाखल होणार आहे. ही यात्रा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये दुपारी २ च्या सुमारास प्रवेश करणार आहे. तब्बल १४ वर्षानंतर येथे आज काँग्रेसच्या बड्या नेत्याची सभा होणार आहे. ही यात्रा १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तर या यात्रेचा समारोप हा १७ मार्च ला होणार आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राहुल गांधी नंदुरबार येथे रोड शो करणार आहेत. यानंतर येथील सी. बी ग्राऊंडवर मोठी सभा होणार आहे. या साठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात ही मणीपुर येथून करण्यात आली होती. या यात्रेला १५ जानेवारीला मणिपूरमधून सुरुवात झाली होती. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७०० किमीचा प्रवास करत नंदुरबार येथे पोहचणार आहे. या यात्रेत काँग्रेससह इंडिया आघाडीतिल अनेक नेते सहभागी होणार आहे. १४ वर्षानंतर गांधी परिवारातील नेत्याची सभा नंदुरबार येथे होत असल्याने काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या साठी या ठिकाणी मोठा संभामंडप उभारण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे दुपारी २ च्या सुमारास हेलिकॉप्टरनं नंदुरबार येथे पोहोचणार आहेत. यानंतर नंदुरबार पोलीस मुख्यालयापासून सभास्थाळापर्यंत रोड शो काढला जाणार आहे. सी.बी ग्राऊंडवर सभेचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी राहुल गांधी पोहोचल्यावर आदिवासी होळी पूजन केले जाणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रेसाठी खासदार राहुल गांधी हे २ च्या सुमारास सुरत येथून हेलिकॉप्टरने दुपारी १ नंदुरबारला येणार आहेत. हेलिकॉप्टरनं पोहोचणार आहेत. नंदुरबारच्या पोलीस मुख्यालयापासून २ ते ३ वाजेपर्यंत धुळे चौफुली येथे रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ध्वज कार्यक्रम होणार असून ४ च्या सुमारास सभास्थळी आदिवासी होळी पुजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यानंतर राहुल गांधी यांचे भाषण होणार आहे. सभा संपल्यावर राहुल गांधी हे सांयकाळी साडेचारनंतर दोंडाईचाला प्रस्थान करणार आहेत.