मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Cyber Crime : ऑनलाइन रेटिंग जॉबच्या नादात फसला; तरुणाला ४३ लाख ८२ हजारांचा गंडा

Pune Cyber Crime : ऑनलाइन रेटिंग जॉबच्या नादात फसला; तरुणाला ४३ लाख ८२ हजारांचा गंडा

Mar 07, 2024, 06:14 AM IST

    • Pune Cyber Crime : पुण्यात मोठ्या (Pune crime) प्रमाणात सायबर क्राइम वाढले आहे. ऑनलाइन जॉबच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे.
ऑनलाइन रेटिंग जॉबच्या नादात फसला; तरुणाला ४३ लाख ८२ हजारांचा गंडा

Pune Cyber Crime : पुण्यात मोठ्या (Pune crime) प्रमाणात सायबर क्राइम वाढले आहे. ऑनलाइन जॉबच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे.

    • Pune Cyber Crime : पुण्यात मोठ्या (Pune crime) प्रमाणात सायबर क्राइम वाढले आहे. ऑनलाइन जॉबच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना आता उघडकीस आली आहे.

Pune Crime news : पुण्यात गेल्या काही दिवसांनपासून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. विविध माध्यमांतून नागरिकांच्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना उघडकीस आली असून एकाला ऑनलाइन रेटिंग जॉबच्या नावाखाली तरुणाला तब्बल ४३ लाख ८२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Maharashtra Economy : महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार – देवेंद्र फडणवीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्रशांती अनोलॉग अ‍ॅण्ड डिजीटल लॅब इंडिया प्रा. लि या सोशल मार्केटींग कंपनीशी संबंधीत असल्याची व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्रामवर बतावणी करून हॉटेलचे रिव्यू आणि रेटींग टास्क देऊन तरुणाची ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोबाईल नंबरधारक तसेच विविध वेबसाईटीशी संबंधीत अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कैलास भागवत बोरोले (वय ४६, रा. सेरेना बाणे, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार १५ जानेवारी ते २० जानेवारी २०२४ दरम्यान घडला.

Maharashtra Weather Update : विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट कायम; ढगाळ हवामानासह गारठा वाढणार

सायबर चोरट्यांनी फिर्यादीला ऑनलाइन रेटिंगचे टास्क दिले. या माध्यमातून हॉटेल रिव्यू आणि टास्क देऊन किरकोळ २ हजार ८०० रूपये फिर्यादी यांना मोबदला म्हणून दिले. त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून घेतला. नंतर एका ट्रेडिंग पोर्टलला लॉगीन करण्यास सांगितले. तसेच त्यावर अधिक चांगला मोबदला मिळणार असल्याचे प्रलोभन फिर्यादीला देण्यात आले. दरम्यान, वेलफेअर टास्क क्रिण्टो शेअर ट्रेडिंग या नावाने एका टेलीग्राम आयडीधारका सोबत फिर्यादी यांना संपर्क करण्यास सांगितला. तसेच फियादीकडून वेळोवेळी प्रलोभन दाखवून मोबदला वगळता तब्बल ४३ ख ८२ हजार रूपये घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करणे पडले १३ लाखांना

नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करणे एकाला चांगलेच महाग पडले आहे. नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर जॉब व्हिझा फी, प्रोसेस हेल्थ इन्शुरन्स कव्हर फी, ट्रॅव्हल्स चेक, बँक अकाउंट ओपनींग फी, कन्सोलेट डिपॉझीट फी, हाय स्क्रिल इंमीग्रीण्ट परमीट, सर्टिफिकेट नोटरी फी, न्यु अपाईन्टमेंट फी अशा वेगवेगळया कारणासाठी तब्बल १३ लाख उकळूहनही नोकरी देता फसवणुक केल्याप्रकरणी मोबाईल नंबरधारक व्यक्ती व त्यांच्या साथीदारांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अलनकी कासम चीनी (वय ३३, रा. वॉटर बे अपार्टमेंट, वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० नोव्हेंबर २०२३ ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या