मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani Crime : परभणी हादरले ! चोरट्यांनी दुकानदाराचे हात-पाय बांधून शेतात नेत पाजले विष

Parbhani Crime : परभणी हादरले ! चोरट्यांनी दुकानदाराचे हात-पाय बांधून शेतात नेत पाजले विष

Jan 23, 2023, 12:28 PM IST

    • Parbhani Crime : परभणीत एक मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालत एका दुकानदारांचे हात पाय बांधून त्याला शेतात नेत विष पाजले.
Parbhani Crime (HT_PRINT)

Parbhani Crime : परभणीत एक मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालत एका दुकानदारांचे हात पाय बांधून त्याला शेतात नेत विष पाजले.

    • Parbhani Crime : परभणीत एक मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालत एका दुकानदारांचे हात पाय बांधून त्याला शेतात नेत विष पाजले.

परभणी: परभणी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एका दुकानदाराला लुटत त्याचे हात पाय बांधून शेजारील शेतात नेऊन त्याला विष पाजल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील खेर्डा येथे १२ जानेवारी रोजी घडली. सुदैवाने दुकानदाराजवळ मोबाइल असल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार गणेश रंगनाथ भुजबळ याचे चोरट्यांनी अपहरण करत त्याला विष पाजले. चोरट्यांनी दुकानाचे दार वाजवून त्याला चाकूचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. त्याच्या दुकानाच्या गल्ल्यातील ५१ हजार रुपयांची रक्कम लुटले. त्यानंतर चोरट्यांनी रंगनाथचे हात पाय बांधून बाजूच्या शेतात नेले. या ठिकाणी त्याला त्यांनी जबरदस्तीने विष पाजले आणि चोरटे पसार झाले. 

रंगनाथ जवळ मोबाईल असल्याने त्याने त्याच्या मित्राशी संपर्क साधला. त्यानंतर त्याचा मित्र शेतात आला. त्याने गणेशला तातडीने उपचारासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले.  या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

यानंतर त्याला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. उपचार घेतल्यानंतर प्रकृती ठीक झाल्याने गणेशला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यावर त्याने सेलु पोलीस ठाण्यामध्ये येत गुन्हा दाखल केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या