मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganesh Visarjan Kolhapur : सुतळी बॉम्ब फुटल्याने गणेशभक्ताचा डोळा निकामी; विसर्जनावेळी धक्कादायक प्रकार

Ganesh Visarjan Kolhapur : सुतळी बॉम्ब फुटल्याने गणेशभक्ताचा डोळा निकामी; विसर्जनावेळी धक्कादायक प्रकार

Sep 30, 2023, 07:49 AM IST

    • Kolhapur News : गणेश विसर्जन सुरू असताना सुतळी बॉम्ब फुटला का नाही, पाहायला गेलेल्या गणेशभक्ताचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kolhapur Ganesh Visarjan News (HT)

Kolhapur News : गणेश विसर्जन सुरू असताना सुतळी बॉम्ब फुटला का नाही, पाहायला गेलेल्या गणेशभक्ताचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Kolhapur News : गणेश विसर्जन सुरू असताना सुतळी बॉम्ब फुटला का नाही, पाहायला गेलेल्या गणेशभक्ताचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kolhapur Ganesh Visarjan News : मुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये उत्साहात आणि जल्लोषात गणरायाला निरोप देण्यात आला आहे. यावेळी नाशिक, पुण्यासह ठाण्यात काही ठिकाणी पाण्यात बुडाल्याने गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्या आहे. परंतु आता कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपतीचं विसर्जन सुरू असताना लावलेला सुतळी बॉम्ब फुटत का नाही, पाहायला गेलेल्या तरुणाचा डोळा निकामी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली गावात ही घटना घडली आहे. डोळ्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर जखमी गणेशभक्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कोडोली गावात गुरुवारी गणेश विसर्जन सुरू होतं. त्यावेळी गावातील तरुण भारत चव्हाण याने लोखंडी नळीत सुतळी बॉम्ब लावला होता. परंतु बराच वेळ झाल्याने सुतळी बॉम्ब फुटलाच नाही. फटाका का फुटला नाही, हे पाहण्यासाठी भारत जवळ गेला. परंतु त्याचवेळी सुतळी बॉम्ब फुटला आणि भारतच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत भारतने डावा डोळा गमावला होता. त्यामुळं आता कोल्हापुरातील या घटनेने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जल्लोषात बाप्पांना निरोप देण्यात आला आहे. गणेश मंडळाकडून विविध देखावे आणि डॉल्बी सिस्टीम लावण्यात आली होती. यावेळी शिवारातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. कोडोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. याचवेळी भारत चव्हाणने लोखंडी नळीत सुतळी बॉम्ब लावला होता. सुतळी बॉम्ब का फुटत नाही, हे पाहण्यासाठी भारत गेला. त्याचवेळी सुतळी बॉम्ब फुटल्याने गणेशभक्ताला डावा डोळा कायमचाच गमवावा लागला आहे.

पुढील बातम्या