मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरे पोहचले थेट शेतकऱ्यांच्या थेट बांधावर, शेतकऱ्यांना धीर देत म्हणाले…

उद्धव ठाकरे पोहचले थेट शेतकऱ्यांच्या थेट बांधावर, शेतकऱ्यांना धीर देत म्हणाले…

Oct 23, 2022, 02:25 PM IST

    • Uddhav Thackeray Aurangabad Visit : अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील भागांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला आहे.
Uddhav Thackeray Aurangabad Visit (HT)

Uddhav Thackeray Aurangabad Visit : अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील भागांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला आहे.

    • Uddhav Thackeray Aurangabad Visit : अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील भागांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला आहे.

Uddhav Thackeray Aurangabad Visit : गेल्या १५ दिवसांपासून मराठवाड्यात परतीच्या पावसानं कहर केला आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून शेतकऱ्यांना धीर देत मदतीसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा ठाकरेंसमोर मांडल्या. पिकांची पाहणी केल्यानंतर ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गंगापूर तालुक्यातील पेंढापूर आणि दहेगांवमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना ते म्हणाले की, संकटं येत असतात, परंतु त्याच्याशी आपल्याला लढायचं आहे. तुमचं नुकसान झालेलं असलं तरी तुम्ही धीर सोडू नका, आपण सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू, असं आश्वासन ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलं आहे. यावेळी गंगापूर तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरेंचा पहिलाच मराठवाडा दौरा...

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. परंतु आता अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी ठाकरे सत्तांतरानंतर ठाकरे पहिल्यांदाच मराठवाड्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावेळी दहेगांव आणि पेंढापूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुढील बातम्या