मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांनी लुटलेले तरुणीचे पैसे शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने परत मिळाले

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांनी लुटलेले तरुणीचे पैसे शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने परत मिळाले

Oct 04, 2022, 05:48 PM IST

    • Pune cyber crime : पुण्यात मोठ्या प्रमाणात सायबर चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असून त्यांना ही रक्कम पुन्हा परत मिळतच नाही. मात्र, पुणे पोलिसांचा शिवाजीनगर येथील सायबर विभागाने एका तरुणीचे गेलेले पैसे हे पुन्हा परत मिळवून दिले आहेत.
The cyber crime (HT_PRINT)

Pune cyber crime : पुण्यात मोठ्या प्रमाणात सायबर चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असून त्यांना ही रक्कम पुन्हा परत मिळतच नाही. मात्र, पुणे पोलिसांचा शिवाजीनगर येथील सायबर विभागाने एका तरुणीचे गेलेले पैसे हे पुन्हा परत मिळवून दिले आहेत.

    • Pune cyber crime : पुण्यात मोठ्या प्रमाणात सायबर चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असून त्यांना ही रक्कम पुन्हा परत मिळतच नाही. मात्र, पुणे पोलिसांचा शिवाजीनगर येथील सायबर विभागाने एका तरुणीचे गेलेले पैसे हे पुन्हा परत मिळवून दिले आहेत.

पुणे : शहरात सायबर फ्रॉडच्या तक्रारी वाढत असताना प्रत्येत पोलिस ठाण्यावर त्यांच्या हद्दीतील सायबर तक्रारींची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी अशाच एका सायबर तक्रारीमध्ये तक्रारदार तरूणीला न्याय मिळवून देताना ऑनलाईन शॉपींग करताना तिच्या गेलेल्या ५५ हजारांपैकी ४५ हजार रूपये परत मिळवून दिले आहे. गोल्डन हावर मध्ये तिने पोलिसांशी साधलेल्या संपर्कामुळे तिला तिचे पैसे परत मिळाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाकडे एका मुलीने ऑनलाईन खरेदी करताना तिचे ५५ हजार रूपये गेल्याची तक्रार केली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ऑनलाईन खरेदी केल्यानंतर तीला तिच्या मोबाईलवर एक लिंक पाठविण्यात आली होती. सायबर चोरट्यांने सांगितल्यानुसार तिने त्याने पाठवलेली लिंक क्लिक केली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या मोबाईलचा ताबा सायबर चोरट्याने घेतला. ताबा मिळाल्याच्या काही मिनिटांच्या आतच त्याने युपीआय ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण ५५ हजार काढुन घेतले. तिने लागलीच याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांना केल्यानंतर सायबर पथकाने तिच्या हस्तातरीत झालेल्या पैशाची व बँकांची माहिती मिळवली. त्यानंतर त्या बँकांशी संपर्क साधून त्यांचे अकाऊंट फ्रिज केले. गेलेल्या ५५ हजारांपैकी आता त्या तरूणीला 45 हजार रूपये मिळाले आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरिविंद माने, सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, अमंलदार गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, रूचिका जमदाडे यांनी कारवाई केली. या तपसाबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वारिष्ट पोलिस निरीक्षक अरविंद माने म्हणाले तरूणी ही नोकरदार असून तिचे नुकतेच लग्न ठरले आहे. त्याच अनुषंगाने तीने ऑनलाइन शॉपींग केली होती. ही शॉपींग करताना तीचे ५५ हजार रूपये सायबर चोरट्यांनी चोरले होते. तिचे ४५ हजार रूपये तिला परत मिळवून देण्यात आमच्या सायबर पथकाला यश आले आहे. दिवाळी तसेच इतर सणांच्या तोंडावर ऑनलाईन खरेदी करताना अशी फसवणुकीची शक्यता पाहता कुठल्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. तसे काही घडल्यास १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या