मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : 'अग्निपथ’ लष्कर भरतीसाठी दिले बनावट रहिवासी प्रमाणपत्र; पुण्यातून दोघांना अटक

Pune Crime : 'अग्निपथ’ लष्कर भरतीसाठी दिले बनावट रहिवासी प्रमाणपत्र; पुण्यातून दोघांना अटक

Oct 03, 2022, 04:42 PM IST

    • Pune Crime news: लष्कराच्या अग्निपथ योजनेत सहभाग घेण्यासाठी बनावट रहिवाशी प्रमाणपत्र देऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Pune crime (HT_PRINT)

Pune Crime news: लष्कराच्या अग्निपथ योजनेत सहभाग घेण्यासाठी बनावट रहिवाशी प्रमाणपत्र देऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    • Pune Crime news: लष्कराच्या अग्निपथ योजनेत सहभाग घेण्यासाठी बनावट रहिवाशी प्रमाणपत्र देऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : लष्कराच्या अग्निपथ भरती योजनेत सहभागी होण्यासाठी बनावट रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट ) काढून देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

पोपट विठ्ठल आलंदार (वय ३८) आणि सुरेश पितांबर खरात (वय ३१, दोघेही रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले, डोमिसाइल प्रमाणपत्र, रोकड तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

लष्करातील नोकरीसाठी भरतीसाठी सध्या मुंबईत अग्निपथ भरती सुरू आहे. त्यात जी डी (जनरल ड्युटी) आणि टेक्निकल अशा दोन पदांसाठी भरती होत आहे़ त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील रहिवासी अर्ज करू शकतात. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर काही उमेदवारांनी एका संस्थेत संपर्क साधला. आरोपींकडून बनावट रहिवाशी दाखला दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, आलंदार आणि खरात यांनी बनावट शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुरावा तयार करण्यासाठी बनावट भाडे करार तयार केले.तसेच सरपंचाचा दाखला घेऊन बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करुन घेतले होते. हा प्रकार उघडकीस आल्यावर कात्रज -देहूरोड बाह्यवळण रस्त्यावर आलंदार आणि खरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. यावेळी सापळा लावून दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे बनावट रबरी शिक्के, शाळा सोडल्याचे कोरे दाखले आढळले आहे. त्यांनी तब्बल ४० उमेदवारांना बनावट रहिवासी प्रमाणपत्रे तयार करून दिल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या