मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : नाशिक-धुळ्यात बरसल्या पावसाच्या सरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

Weather Update : नाशिक-धुळ्यात बरसल्या पावसाच्या सरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

Mar 29, 2024, 07:34 PM IST

  • Maharashtra Weather Update : नाशिक जिल्ह्यात सकाळपासच ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास मालेगाव शहर व परिसरासह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या.

नाशिक-धुळ्यात बरसल्या पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update : नाशिक जिल्ह्यात सकाळपासच ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास मालेगाव शहर व परिसरासह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या.

  • Maharashtra Weather Update : नाशिक जिल्ह्यात सकाळपासच ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास मालेगाव शहर व परिसरासह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत पारा ४० अंशापेक्षा जास्त झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच आता नाशिक व धुळे जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्याने घामाच्या घारा काढणाऱ्या उष्म्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसाने शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

नाशिक जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासच ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सायंकाळच्या सुमारास मालेगाव शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या. 

लासलगाव, चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी, विटावे, सळसाने, पाटे, कोलटेक परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार सरी बरसल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा ४० अंशापेक्षा अधिक वाढल्याने उकाडा वाढला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि पावसाचा हलका शिडकाव झाल्याने वातावरण आल्दाददायक झाले आहे. मालेगावचा पारा गुरुवारी ४२ अंशावर पोहोचला होता. या अवकाळी पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी बळाराजा धास्तावला आहे. 

पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणातील तापमानात काहीशी घट झाली आहे. तापमानात घट झाली असली तरी ढगाळ वातावरण असल्याने उष्म्यात वाढ झाली आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या