मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vikram Kale : ‘आमदारांना ५ वर्षांत पेन्शन मिळते, मग ३० वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना का नाही?’

Vikram Kale : ‘आमदारांना ५ वर्षांत पेन्शन मिळते, मग ३० वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना का नाही?’

Dec 28, 2022, 04:26 PM IST

  • vikram kale on teachers pension : शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे.

Old Pension Scheme

vikram kale on teachers pension : शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे.

  • vikram kale on teachers pension : शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे.

vikram kale on teachers pension : जुन्या पेन्शन योजनेसाठी सध्या सर्वत्र आवाज उठवला जात आहे. राज्याच्या विधान परिषदेतही ही मागणी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. 'एखादा व्यक्ती एकदा आमदार झाला तरी त्याला पेन्शन लागू होते, मग ३० वर्षे काम करूनही शिक्षक कर्मचाऱ्यांना पेन्शन का नाही?, असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार विक्रम काळे यांनी पेन्शनच्या बाबतीत लोकप्रतिनिधी व अन्य कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेल्या भेदभावाकडं व विरोधाभासाकडं सभागृहाचं लक्ष वेधलं. 'एकच मिशन जुनी पेन्शन' या घोषवाक्यानं सुरुवात करत त्यांनी आपला मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. काळे यांनी या विषयाचं गांभीर्य सभागृहाला पटवून दिलं. राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून पुढे सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागून करण्यात आली. मात्र, यापूर्वी जे कर्मचारी सेवेत आले, त्यांच्या शाळेला अनुदान नसल्यानं त्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित राहावं लागले, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. या प्रश्नावर दाद मागण्यासाठी लाखो शिक्षक कर्मचाऱ्यांचा मोर्चा विधानभवनाकडं आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या कर्मचाऱ्यांची पीएफ कपात आजच सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

यापूर्वी देखील या प्रकरणाची चर्चा झाली होती. या मुद्द्यावर सम्यक समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीनं सविस्तर अहवाल सादर केला आहे. मात्र, त्यावर पुढं कुठलीही कार्यवाही झालेली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या