मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Polls 2022: दोन मतांवरील काँग्रेसच्या आक्षेपाला भाजपचं उत्तर

MLC Polls 2022: दोन मतांवरील काँग्रेसच्या आक्षेपाला भाजपचं उत्तर

Jun 20, 2022, 07:39 PM IST

    • निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही, तोपर्यंत  मतमोजणीला सुरुवात होणार नाही. दरम्यान काँग्रेसच्या आक्षेपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.
मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप

निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही, तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही. दरम्यान काँग्रेसच्या आक्षेपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.

    • निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही, तोपर्यंत  मतमोजणीला सुरुवात होणार नाही. दरम्यान काँग्रेसच्या आक्षेपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.

मुंबई -विधान परिषदेसाठी आज मतदान पार पडले असून आता निकालाची उत्सुकता आहे. या मतदानासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली होती. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदानकेले आहे. मात्र काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही, तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही. दरम्यान काँग्रेसच्या आक्षेपाला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार


काय आहे काँग्रेसचा आक्षेप?

काँग्रेसकडून आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेण्यात आले आहेत. या दोन्ही आमदारांच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीला सहकार्यासाठी मतदानासाठी घेतले. हे दोन्ही आमदार सही करू शकत होते, मग मतदानाला दुसऱ्याला का पाठवले? यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे. यावर निर्णय होईल असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या आक्षेपावर भाजपचे स्पष्टीकरण -

काँग्रेसने घेतलेले आक्षेप बालिशपणाचे असून, ३ दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे लेखी परवानगी घेतली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतही असेच मतदान झाले होते. लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी नियमानुसारच मतदान केले. मग आताच्या निवडणुकीत आक्षेप का? यात कुठलीही अडचण नाही. निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देतील. टाईमपास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा म्हणून हा आक्षेप घेण्यात आला आहे असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसला लगावला आहे.

 


हे खालच्या पातळीचं राजकारण –

काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी हा तर असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं म्हणत काँग्रेसच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे तर राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी दोघांनीही मतदानावर आक्षेप घेतले होते. या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदान केले होते. परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या