मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रकाश आंबेडकर अभ्यासू पण विश्वासू नाहीत, त्यांच्यामागे नेहमी संघाच्या लोकांचा वेढा- इम्तियाज जलील

प्रकाश आंबेडकर अभ्यासू पण विश्वासू नाहीत, त्यांच्यामागे नेहमी संघाच्या लोकांचा वेढा- इम्तियाज जलील

Oct 29, 2022, 11:18 AM IST

    • MIM MP Imtiaz Jalil : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू व्यक्ती असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचं वक्तव्य औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
MIM MP Imtiaz Jalil On Prakash Ambedkar (HT)

MIM MP Imtiaz Jalil : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू व्यक्ती असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचं वक्तव्य औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

    • MIM MP Imtiaz Jalil : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू व्यक्ती असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचं वक्तव्य औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

MIM MP Imtiaz Jalil On Prakash Ambedkar : २०१९ ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनं एकत्र येत लढवली होती. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटपावरून वाद झाल्यानं दोन्ही पक्षांनी वेगळी वाट धरली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी नेहमीच एकमेकांवर टीका केली होती. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आता या निवडणुकांमध्ये पुन्हा वंचितसोबत एमआयएम युती करेल का?, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांच्या विश्वास ठेवता येणार नाही. त्यांच्याभोवती नेहमीच आरएसएसशी संबंधित लोकांचा वेढा असतो, असं म्हणत जलील यांनी प्रकाश आंबेडकरांवर टिकास्त्र सोडलं आहे. याशिवाय आगामी निवडणुकांत आम्ही वंचित सोबत युती करण्याची शक्यता फार कमी असल्याचंही जलील म्हणाले.

औरंगाबादची लोकसभा निवडणूक पुन्हा लढवणार- जलील

आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम ४० जागा लढवणार असून लोकसभेसाठी पक्षामार्फत बीड, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू असल्याचंही ते म्हणाले. याशिवाय औरंगाबादची लोकसभा निवडणुकही मीच लढवणार असल्याचा खुलासा जलील यांनी केला आहे.

पुढील बातम्या