मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah : पडद्यामागे काहीतरी घडतंय?; अमित शहा १५ दिवसांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, चर्चांना उधाण

Amit Shah : पडद्यामागे काहीतरी घडतंय?; अमित शहा १५ दिवसांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, चर्चांना उधाण

Apr 26, 2023, 10:16 AM IST

  • Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. एकाच महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. ते या पूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते.

Amit Shah (PTI)

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. एकाच महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. ते या पूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते.

  • Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. एकाच महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. ते या पूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते.

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. एकाच महिन्यात त्यांचा हा दूसरा महाराष्ट्र दौरा आहेत. शाह हे या पूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. आता ते बुधवारी नागपूर येथे येणार आहेत. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा यांच्या च्या हस्ते करण्यात येणार आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्वगतासाठी नागपूर येथे हजर राहणार आहे. दरम्यान, शहा यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त घेवण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून मजनूने पेटवली युवतीची दुचाकी, तरुणाला अटक

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर हा पुरस्कार वितरित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खारघर येथे आले होते. त्यानंतर पुन्हा ते बुधवारी रात्री नागपूर येथे येणार आहेत. येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घघाटन केले जाणार आहे. आज रात्री ते नागपूरमध्ये पोहोचतील. या ठिकाणी ते पक्षातील महत्वाच्या पदाढीकऱ्यांची बैठक देखील घेणार आहे.

Pune Zhila parishad : पुणे जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार; बोगस पाणी परवाण्यावर वाटले पावणेदोन कोटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या स्वगतासाठी आज नागपूरमध्ये येणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती आणि येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भेटीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहणार आहे.

दरम्यान, शहा यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहा यांची निवास व्यवस्था रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. काल पासून या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अमित शहा यांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिस आय़ुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आहे. दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाकडून हॉटेलच्या सर्व परिसर हा तपासण्यात आला आहे. शहा यांच्यासाठी बुलेटप्रूफ वाहनदेखील तैनात करण्यात आले आहे. २ डीसीपी, ५० पोलिस निरिक्षक आणि १५० पोलीस उपनिरीक्षक, २ हजार पोलीसांचा अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी तैनात करण्यात आले असून गुरुवारी शहरातील वाहतूक व्यवस्था देखील बदलण्यात येणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या