मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या धमाक्याला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर

Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या धमाक्याला उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर

Mar 24, 2023, 10:36 AM IST

  • Uddhav Thackeray reply to Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास तासभर केलेल्या भाषणाला उद्धव ठाकरे यांनी अवघ्या एका वाक्यात खोचक उत्तर दिलं आहे.

Raj Thackeray - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray reply to Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास तासभर केलेल्या भाषणाला उद्धव ठाकरे यांनी अवघ्या एका वाक्यात खोचक उत्तर दिलं आहे.

  • Uddhav Thackeray reply to Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास तासभर केलेल्या भाषणाला उद्धव ठाकरे यांनी अवघ्या एका वाक्यात खोचक उत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray reply to Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यात माहीमच्या समुद्रातील बेकायदा मजारीचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेनेनं व महाविकास आघाडीनं याकडं दुर्लक्ष केलं, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

माहीमच्या समुद्रात बेकायदा मजार बांधली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. महापालिका प्रशासन आणि पोलिसांचं दुर्लक्ष झाल्यानं हे सर्व घडल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांचा रोख शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकेवर होता. राज यांच्या या आरोपांमुळं खळबळ उडाली होती.

विधान भवनाच्या आवारात उद्धव ठाकरे यांनी आज त्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, 'हे बांधकाम काही नवीन नव्हतं. मनसेचे आमदार आणि नगरसेवक त्या भागात असतानाही ते होतं. फरक इतकाच आहे की आता त्यांना जशी स्क्रीप्ट आली असेल, तसं ते बोलले असतील.

राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच त्यावर झालेल्या कारवाईबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. राज्यात अशा अनेक बेकायदा गोष्टी आहेत, लोकांनी त्या राज ठाकरे यांना कळवाव्यात. ते पत्र लिहितील म्हणजे कारवाई होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून भाजपनं दिलेल्या स्क्रीप्टवर बोलतात, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातो. हाच मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी आज केला.

घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्ड

उद्धव ठाकरे यांनाच कंटाळून अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली, असा आरोप काल राज ठाकरे यांनी केला होता. त्या आरोपांवर बोलणं उद्धव यांनी टाळलं. घासून गुळगुळीत झालेली ती रेकॉर्ड आहे. त्यावर बोलण्याची काही गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या