मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani News: कोर्टात अर्धा तास उशिरा पोहचणं दोन पोलिसांना पडलं महागात; न्यायाधीशांनी दिली 'ही' शिक्षा ऐकून व्हाल थक्क

Parbhani News: कोर्टात अर्धा तास उशिरा पोहचणं दोन पोलिसांना पडलं महागात; न्यायाधीशांनी दिली 'ही' शिक्षा ऐकून व्हाल थक्क

Nov 22, 2023, 09:44 AM IST

    • Parbhani News update : आरोपीला सुट्टीच्या दिवशी कोर्टात तब्बल अर्धा तास उशिरा आणणं दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांना न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली असून या शिक्षेची चर्चा सध्या सुरू आहे.
Parbhani News update

Parbhani News update : आरोपीला सुट्टीच्या दिवशी कोर्टात तब्बल अर्धा तास उशिरा आणणं दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांना न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली असून या शिक्षेची चर्चा सध्या सुरू आहे.

    • Parbhani News update : आरोपीला सुट्टीच्या दिवशी कोर्टात तब्बल अर्धा तास उशिरा आणणं दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांना न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली असून या शिक्षेची चर्चा सध्या सुरू आहे.

Parbhani court news update : परभणी येथे दोन पोलिसांना आरोपीला कोर्टात ३० मिनिटे उशिरा घेऊन पोहचणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे न्यायाधीश चांगलेच भडकले. आरोपी एवजी पोलिसांनाच त्यांनी उशिरा आल्याबद्दल शिक्षा सुनावली. ही घटना परभणीतील मानवत येथे घडली. न्यायाधीशांनी दोन्ही पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा चर्चेचा विषय ठरली आहे. या शिक्षेमुळे दोन्ही पोलिस नाराज असून या बाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Israel Hamas war : इस्रायल चार दिवसांत करणार युद्धविराम? ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल-हमासमध्ये करार

मानवत पोलिस ठाण्यातील एक हवालदार आणि हेड कॉन्स्टेबल या दोघांना कोर्टात उशिरा पोहचल्याने गावात असलेले गवत कापण्याची शिक्षा देण्यात आली. या शिक्षेमुळे संतप्त झालेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. दरम्यान, परभणी एसपी यांनी या प्रकरणी कारवाई बाबत शिथिलतेसाठी न्यायालयाकडे अहवाल पाठवण्यात येईल असे सांगितले.

Train Cancelled List : धुक्यामुळं तब्बल ६२ रेल्वे गाड्या दोन महिन्यांसाठी रद्द! रेल्वेनं केली यादी जाहीर, वाचा सविस्तर

नेमके काय आहे प्रकरण ?

२२ ऑक्टोबरच्या रात्री गस्तीदरम्यान दोन्ही पोलिस हे गस्तीवर होते. यावेळी त्यांनी संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या दोघांना पकडले होते. या आरोपींना सकाळी ११ वाजता सुट्टीच्या दिवशीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यांना ११ वाजता कोर्टात पोहचण्याचे होते. मात्र, आरोपीसह दोन्ही पोलिस हे ११.३० वाजता न्यायालयात पोहोचले, त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ही चांगलेच रागावले. त्यांनी थेट दोन्ही पोलिसांना गावातील गवत कापण्याची शिक्षा दिली.

अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी पोलिस स्टेशनच्या डायरीत संपूर्ण घटनेची नोंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. परभणीचे एसपी प्रभारी म्हणाले, 'जेव्हा हे आमच्या निदर्शनास आणले गेले, तेव्हा हवालदाराच्या वक्तव्यासह सविस्तर अहवाल योग्य कारवाईसाठी न्यायव्यवस्थेकडे पाठवण्यात आला आहे.' आणखी तीन हवालदारांचे जबाबही या प्रकरणी नोंदवण्यात आले आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या