Train Cancelled List : धुक्यामुळं तब्बल ६२ रेल्वे गाड्या दोन महिन्यांसाठी रद्द! रेल्वेनं केली यादी जाहीर, वाचा सविस्तर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Train Cancelled List : धुक्यामुळं तब्बल ६२ रेल्वे गाड्या दोन महिन्यांसाठी रद्द! रेल्वेनं केली यादी जाहीर, वाचा सविस्तर

Train Cancelled List : धुक्यामुळं तब्बल ६२ रेल्वे गाड्या दोन महिन्यांसाठी रद्द! रेल्वेनं केली यादी जाहीर, वाचा सविस्तर

Nov 22, 2023 08:12 AM IST

Indian Railways News : देशभरात थंडी वाढणार आहे. या सोबतच धुके देखील वाढणार असल्याने पुढील दोन महिन्यासाठी ६२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते दीपक कुमार यांनी दिले आहे.

Indian Railways
Indian Railways (MINT_PRINT)

Indian Railways 62 train cancelled due to fog for next tow month: देशभरात थंडी वाढणार आहे. या सोबतच धुके देखील वाढणार आहे. धुक्यात दृशमानता कमी असल्याने रेल्वे व्यवस्थापनात अनेक अडचणी येत असतात. तसेच गाड्या या धीम्या गतीने पुढे जात असतात. धुक्यात रेल्वे प्रवासात लागणारा जादा वेळ लक्षात घेऊन उत्तर रेल्वेने तयारी सुरू केली आहे. धुक्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने डिसेंबरच्या सुरुवातीपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत एकूण ६२ गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये दिल्लीहून धावणाऱ्या नऊ गाड्यांचाही समावेश आहे. तर ३० गाड्यांच्या फेऱ्या या कमी करण्यात आल्या आहेत, तर सहा गाड्यांचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात थंडीच्या महिन्यात पावसाची अनुभूती; रेनकोट बाहेर काढा! असे असेल हवामान

उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडीमुळे धुके वाढणार आहे. अशा परिस्थितीत गाड्या चालवण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वेचे वेळापत्रक चोख ठेवण्यासाठी उत्तर रेल्वेने यंदा ६२ गाड्या तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या अमृतसर, चंदीगड, नवी दिल्ली, जम्मू तवी, अंबाला, बरौनी, जयनगर, आनंद विहार, लखनौ इत्यादी ठिकाणांहून धावतात. या गाड्या न चालवल्यामुळे, ट्रॅक रिकामे राहून इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग धुक्यामुळे कमी असला तरी त्या वेळेवर पोहोचतील.

Mumbai Local Night block : लोकल प्रवाशांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना! गर्डर उभारणीसाठी २० दिवसांचा रात्रब्लॉक

या कालावधीसाठी ३० गाड्यांच्या फेऱ्या या कमी करण्यात आल्या आहेत. काही गाड्या ज्या आठवड्यातून सहा दिवस धावत होत्या त्या आता फक्त दोन किंवा तीन दिवस धावतील. उत्तर रेल्वेनेही सहा गाड्यांचा प्रवास कमी केला आहे. कमी प्रवासामुळे या गाड्या वेळेवर पोहोचू शकतील, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

दिल्लीहून धावणाऱ्या या गाड्या राहतील रद्द

१२३८३/८४ लखनौ-आनंद विहार-लखनौ

१५०५७/५८ गोरखपूर-आनंद विहार-गोरखपूर

०४०५५/५६ बलिया-आनंद विहार-बलिया

१४००५/०६ आनंद विहार-सीतामढी-आनंद विहार

१४००३/०४ नवी दिल्ली-मालदा टाउन-नवी दिल्ली

२०४५१/५२ नवी दिल्ली-सोगरिया-नवी दिल्ली

१५६२१/२२ आनंद विहार-कामाख्या-आनंद विहार

१२८७३/७४ आनंद विहार-संत्रागाछी-आनंद विहार

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर