मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Crime News : पुजाऱ्याला मारहाण करत मंदिरात चोरी, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Palghar Crime News : पुजाऱ्याला मारहाण करत मंदिरात चोरी, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

May 14, 2023, 07:18 PM IST

    • Bhoisar Crime News : पालघरच्या एका मंदिरात पुजाऱ्याला मारहाण करत लाखोंची कॅश लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Palghar Crime News Marathi (HT)

Bhoisar Crime News : पालघरच्या एका मंदिरात पुजाऱ्याला मारहाण करत लाखोंची कॅश लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    • Bhoisar Crime News : पालघरच्या एका मंदिरात पुजाऱ्याला मारहाण करत लाखोंची कॅश लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Saibaba Temple Bhoisar Palghar : जालन्यातील समर्थ रामदास स्वामी यांच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आता पालघरमधील साईबाबा मंदिरात पुजाऱ्याला बेदम मारहाण करत लाखो रुपयांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातील भोईसरच्या साईबाबा मंदिरात ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी लाखोंची रोकड, फर्निचरवर डल्ला मारला आहे. तसेच मंदिरातील आवारात उभ्या असलेल्या एका कारलाही आग लावली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील भोईसरच्या साईबाबा मंदिरात शुक्रवारी रात्री दोन चोरट्यांनी पुजाऱ्याला मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. याशिवाय मंदिर परिसरात उभ्या असलेल्या एका वाहनाला आग लावून त्याच्या मालकावरही चाकूहल्ला केला. त्यानंतर जखमी पुजाऱ्याने या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजवरून आरोपींची ओळख पटवली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. तक्रारदार जखमी पुजाऱ्याला गंभीर मार लागला असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पालघरमध्ये जमावाने साधुंवर हल्ला करत त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणावरून चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर आता साईबाबा मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आल्याने पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. पालघर पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ४५७, ३८० आणि ४३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या