मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Residential Building Fire: ठाण्यात सात मजली इमारतीला आग; २२५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

Thane Residential Building Fire: ठाण्यात सात मजली इमारतीला आग; २२५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

Mar 18, 2024, 10:27 AM IST

  • Thane Fire News Today: ठाण्यातील एका सात मजली इमारतीला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.

Thane Fire

Thane Fire News Today: ठाण्यातील एका सात मजली इमारतीला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.

  • Thane Fire News Today: ठाण्यातील एका सात मजली इमारतीला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.

Thane Residential Building Fire: ठाणे जिल्ह्यातील एका सात मजली निवासी इमारतीला सोमवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगाची माहिती मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले. आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नासून २२५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिसरातील कौसा येथील इमारतीला मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी आग लागली. इमारतीतील सुमारे २२५ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. खबरदारी म्हणून इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

viral news : काय सांगता! सामुदायिक विवाह सोहळ्याचे अनुदान लाटण्यासाठी लावले भाऊ-बहिणीने लग्न

स्थानिक अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि वीज पुरवठा कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पहाटे अडीच वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

सोमवारी इमारतीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे वीज कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. विद्युत मीटर कक्षात आग लागल्याने ५० वीज मीटर जळून खाक झाली आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या