uttar pradesh viral news : उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील लक्ष्मीपूर भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत मिळणारे अनुदान आणि गृहपयोगीवस्तु लाटण्यासाठी एकाने चक्क शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सामुदायिक विवाह सोहळ्यात मिळणारे अनुदान मिळण्याच्या लालसेने खोटा वर तयार करण्यात आला. मात्र तो न आल्याने कुटुंबीय आणि मध्यस्थांनी आधीच विवाहित मुलीचे लग्न तिच्या भावासोबत लावून दिले. ही बाब जेव्हा उघड झाली तेव्हा एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच बीडीओ यांनी तात्काळ गटातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पळवत लग्नात दिलेले सर्व घरगुती साहित्य परत वसूल केले. तर अनुदान म्हणून देण्यात येणारी ३५ हजार रुपयांची रक्कम देखील रोखण्यास सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत लक्ष्मीपूर ब्लॉकमध्ये ५ मार्च रोजी ३८ जोडप्यांचे लग्न झाले. यामध्ये लक्ष्मीपूर परिसरातील एका गावातील मुलीचीही नोंद झाली होती. बृजमानगंज भागातील लेहराजवळील एका गावात एका वर्षापूर्वी मुलीचे लग्न झाले होते. यानंतरही मध्यस्थांनी मुलीला लग्न पुन्हा लावून देण्यास होकार दिला. मात्र लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या मुलाने दांडी मारल्याने अनुदानाच्या रकमेसाठी मध्यस्थांनी मुलगी आणि तिच्या भावाचे लग्न या सोहळ्यात लावून दिले. या मुलीचा नवरा हा कामानिमित्त शहारा बाहेर असतो. दरम्यान, ही प्रकरण आता अधिकाऱ्यांच्या देखील अंगलट येणार आहे. याप्रकरणी अनेक ब्लॉक कर्मचाऱ्यांवर कारवाईही होऊ शकते.
याबाबत महाराजगंजचे जिल्हाधिकारी अनुनय झा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, भाऊ आणि बहिणीच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही तक्रार मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून तपासा आधारे कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
संबंधित बातम्या