ready reckoner rate pune : मुंबई प्रमानेच पुण्यात आपले घर असावे अशी इच्छा सर्वसामान्य नागरिकांची असते. मात्र, पुण्यात देखील घरांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने पुण्यातील घरांच्या किमती या वाढणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून अथवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच घरांच्या किमिती या गगनाला भिडल्या असतांना आता पुण्यात घर घेणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर जाणार आहे.
रेडीरेकनर दारवरुन घरांच्या किमीती या ठरत असतात. ही दरवाढ दरवर्षी एप्रिल महिन्याच्या १ तारखेला केली जाते. गेल्या वर्षी पुण्यात रेडीरेकनरचे दर स्थिर होते. मात्र, यावर्षी ही दर आता वाढणार आहे. ही दर ठरवण्याची पद्धत देखील बदलण्यात आली आहे. ही दर आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून ठरवण्यात येणार आहे. रेडीरेकनरचे दर निश्चित झाल्यावर राज्य सरकारकडून त्यावर निर्णय देते. तसेच हा निर्णय नोंदणी महानिरीक्षक यांच्या कडून काहीर केले जात असतात.
या वर्षी पुण्याच्या शहरी भागात ९ टक्के, नगरपरिषद क्षेत्रात ४ टक्के, प्रभाव क्षेत्रात ४.५० टक्के आणि ग्रामीण भागात ७ टक्के ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ही दरवाढ १ एप्रिल अथवा निवडणूक आचारसंहिता झाल्यावर लागू केली जाणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्यात आलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे या दरात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात घर घेणाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्ष भरात झालेल्या दस्त नोंदवणीवरुन ही आकडेवाडी समोर आली आहे. दस्तनोंदणीमुळे १५ मार्चपर्यंत तब्बल ४५ हजार ४५० कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. यामुळे रेडीरेकनरचे नवे दर प्रस्तावित करण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या