मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane sex Racket : मॉल परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक, दोन अभिनेत्रींची सुटका

Thane sex Racket : मॉल परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक, दोन अभिनेत्रींची सुटका

Dec 30, 2022, 12:23 AM IST

  • Thane police busted sex racket : ठाण्यातील एका मॉल परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्या तावडीतून दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे.

सांकेतिक छायाचित्र

Thane police busted sex racket : ठाण्यातील एका मॉल परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्या तावडीतून दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे.

  • Thane police busted sex racket : ठाण्यातील एका मॉल परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्या तावडीतून दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे.

Thane sex Racket news : ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शहरातील घोडबंदर रस्त्यावरील एका मॉलपरिसरात शरीरविक्रय व्यवसाय चालविणाऱ्या दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अटक केली. या रॅकेटमधून हिंदी मालिका तसेच वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या दोन अभिनेत्रींची पोलिसांनी सुटका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

मिळालेल्या माहितीनुसार सिने वंडर मॉलच्या तळ मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये एक महिला काही तरुणींना शरीर विक्रय व्यवसायासाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिस पथकाने २९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बनावट गिऱ्हाईक पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश केला. एका महिलेला अटक करून तिच्या तावडीतून मराठी, हिंदी वेब सिरीज, मालिका तसेच संगीत अल्बममध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींची सुटका केली. या दलाल महिलेविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुटका करण्यात आलेल्या दोन तरुणींना मानपाडा, ठाणे येथील सुरक्षागृहात ठेवले आहे.

 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या