मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  औरंगाबाद ऑनर किलिंग : बहिणीला पळवून नेणाऱ्याची भररस्त्यात हत्या, मृतदेहाजवळ केला जल्लोष

औरंगाबाद ऑनर किलिंग : बहिणीला पळवून नेणाऱ्याची भररस्त्यात हत्या, मृतदेहाजवळ केला जल्लोष

Dec 29, 2022, 10:42 PM IST

  • Aurangabad Honour killing :  बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याच्या रागातून तीन वर्षानंतर एकाने बहिणीच्या पतीची भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निघृण हत्या केली आहे. या घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे.

औरंगाबाद ऑनर किलिंग 

Aurangabad Honour killing : बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याच्या रागातून तीन वर्षानंतर एकाने बहिणीच्या पतीची भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निघृण हत्या केली आहे. या घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे.

  • Aurangabad Honour killing :  बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याच्या रागातून तीन वर्षानंतर एकाने बहिणीच्या पतीची भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निघृण हत्या केली आहे. या घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे.

Aurangabad Honour killing : औरंगाबाद जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. तीन वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणाची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर, तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ जल्लोष देखील केल्याचे सांगितले जात आहे. या भयंकर घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. बापू खिल्लारे (वय ३० वर्षे) असे मृत तरुणाचा नाव आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Swine Flu : नाशिकमध्ये H1N1 व्हायरसचे थैमान! एकाच दिवशी दोघांचे मृत्यू, रुग्णसंख्या २८ वर

छत्रपती संभाजीनगर : 'मम्मी मी तुला सांगू शकले नाही'.. शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून १५ वर्षीय मुलीनं संपवलं जीवन

पुण्यात पुन्हा हिट अँड रन ! १५ वर्षांच्या मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना चिरडलं, तरुणाचा जागीच मृत्यू

Pune karve road accident : पुण्यात कर्वे रोड येथील अपघातात एक ठार; ६६ वर्षीय वृद्ध सायकलस्वाराला क्रेननं चिरडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी बापू याने आरोपीच्या बहिणीला पळवून नेऊन विवाह केला होता. याचा राग मनात धरून आरोपी भावाने आपल्या बहिणीच्या पतीची भररस्त्यात हत्या केली आहे. औरंगाबाद-पुणे महामार्गावरील इसारवाडी फाटा येथे ही घटना घडली आहे. आरोपीने भर रस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून तरुणाची निर्घृण हत्या केली. आरोपीने बहिणीच्या पतीचा जीव गेल्यानंतर रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे. हत्येनंतर आरोपी मोटारसायकलवरून फरार झाला.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला तसेच आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. मृतदेह शवविच्छेदनसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या