मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव

Dec 29, 2022, 09:24 PM IST

  • No confidence motion against Rahul narvekar By MVA : नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. आता महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

अध्यक्ष राहुल नार्वेकर

No confidence motion against Rahul narvekar By MVA : नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. आता महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

  • No confidence motion against Rahul narvekar By MVA : नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. आता महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या हल्ल्यात आता महाविकास आघाडीने मोठं पाऊल उचललं आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव (No confidence motion) आणला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीने विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना सोपवलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचं हे पत्र दिलं. या पत्रावर महाविकास आघाडीच्या ३९ आमदारांच्या स्वाक्षरी आहेत.

महाविकास आघाडीच्या आमदारांना सभागृहात बोलू दिलं जात नसल्यानं मविआनं हे पाऊल उचललं असल्याचं समजत आहे. याच नाराजीतून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस विधिमंडळ सचिवांना देण्यात आलेली आहे. आता या प्रस्तावाबाबत पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असल्यानं प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होण्याची शक्यता फार कमी आहे.

पुढील बातम्या