मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hingoli News : शिंदे गटाचे आमदार लग्नात येताच ‘पन्नास खोके-एकदम ओके’च्या घोषणा, नेत्यांसह कार्यकर्त्यांची धावपळ

Hingoli News : शिंदे गटाचे आमदार लग्नात येताच ‘पन्नास खोके-एकदम ओके’च्या घोषणा, नेत्यांसह कार्यकर्त्यांची धावपळ

May 31, 2023, 02:43 PM IST

    • Thackeray group vs Shinde group : लग्नसोहळ्यात आलेल्या शिंदे गटाच्या आमदाराविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आहे.
Shinde group MLA Santosh Bangar Hingoli (HT)

Thackeray group vs Shinde group : लग्नसोहळ्यात आलेल्या शिंदे गटाच्या आमदाराविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आहे.

    • Thackeray group vs Shinde group : लग्नसोहळ्यात आलेल्या शिंदे गटाच्या आमदाराविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आहे.

Shinde group MLA Santosh Bangar In Hingoli : लग्नसोहळ्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या आमदाराविरोधात '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे आमदार आमदार संतोष बांगर यांच्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी नेते तसेच कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाल्याची पाहायला मिळाली. लग्नसमारंभात '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा देण्यात येत असल्याचं समजताच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कार्यक्रमातून तातडीने काढता पाय घेतला. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील देवेगाव येथे एक लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्याला खासदार संजय जाधव यांनी हजेरी लावली होती. तसेच लग्नसोहळा सुरू झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे देखील देवेगावात दाखल झाले. आमदार संतोष बांगर यांनी खासदार संजय जाधव यांचा आशिर्वाद घेतला आणि त्यानंतर अचानक '५० खोके एकदम ओके'ची घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळं घटनास्थळी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत असताना स्थानिक नेते तसेच ज्येष्ठांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना शांत केलं. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. काहींनी हे राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळं लग्नात विघ्न आणू नका, अशी विनंती केल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते लग्नसमारंभातून निघून गेले. यापूर्वी उदय सामंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक आमदारांसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा दिलेल्या आहे. परंतु आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासमोर '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा देण्यात आल्यामुळं यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

 

पुढील बातम्या