मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Brijendra Singh : कुस्तीपटूंच्या बाजूनं भाजपच्या खासदारानं दंड थोपटले; आता सरकार काय करणार?

Brijendra Singh : कुस्तीपटूंच्या बाजूनं भाजपच्या खासदारानं दंड थोपटले; आता सरकार काय करणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 31, 2023 02:54 PM IST

Brijendra Singh backs protesting wrestlers : कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाजपमधून कुणी एक शब्दही बोलत नसताना हरयाणातील भाजपच्या खासदारानं कुस्तीपटूंना थेट पाठिंबा दिला आहे.

Brijendra Singh
Brijendra Singh

BJP MP backs protesting wrestlers : भाजप खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्या लैंगिक अत्याचाराविरोधात गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंबद्दल देशभरात सहानुभूती वाढत आहे. भाजपच्या गोटातून मात्र यावर अद्याप कोणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता हरियाणातील भाजपचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी उघडउघड कुस्तीपटूंची बाजू घेतली आहे. त्यामुळं सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिजेंद्र सिंह हे माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांचं चिरंजीव आहेत. कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे ते भाजपचे एकमेव खासदार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडल्या. 'काही महिन्यांपूर्वी कुस्तीपटू जेव्हा आंदोलनाला बसले होते, तेव्हाच हे प्रकरण सोडवायला हवं होतं. खेळाडूंनी आपली पदकं गंगेत सोडण्याची वेळ येणं हे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. त्यांना तसं करण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप ब्रिजेंद्र सिंह यांनी केला.

'ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल, जागतिक स्पर्धेतील पदकं जिंकण्यासाठी आयुष्यभर तपश्चर्या करावी लागते. कठोर मेहनत, चिकाटी, शिस्तीची गरज असते. अशी मौल्यवान संपत्ती गंगेत टाकायला कोणाला आवडेल, असा प्रश्न बिजेंद्र सिंह यांनी केला.

'मोहम्मद अली यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचं आम्ही ऐकलं होतं. त्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचा निषेध म्हणून त्यांनी आपलं सुवर्ण पदक ओहियो नदीत फेकलं होतं, असंही ब्रिजेंद्र म्हणाले.

कोण आहेत ब्रिजेंद्र सिंह?

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी बृजेंद्र आणि त्यांचे वडील बिरेंद्र यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. जाट समाजाच्या ब्रिजेंद्र यांनी २०१९ च्या निवडणुकीत हिसर इथून निवडणूक लढवून दुष्यंत चौटाला यांचा पराभव केला होता. शेतकरी आंदोलनाच्या वेळी दोन्ही पिता-पुत्रांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. सरकारच्या दडपशाहीचा निषेधही केला होता.

WhatsApp channel

विभाग