मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune koyta Gang : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच; येरवड्यात तरुणावर वार, चार अल्पवयीन ताब्यात

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच; येरवड्यात तरुणावर वार, चार अल्पवयीन ताब्यात

Jan 30, 2023, 04:33 PM IST

  • Pune koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगचा धुडगूस सुरूच आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना येरवडा परिसरात घडली.

Pune koyta Gang (HT_PRINT)

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगचा धुडगूस सुरूच आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना येरवडा परिसरात घडली.

  • Pune koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगचा धुडगूस सुरूच आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना येरवडा परिसरात घडली.

पुणे : पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच आहे. पोलिसांनी कारवाई करून देखील गुन्हेगारी वाढत आहे. अशीच एक घटना येरवडा परिसरात उघडकीस आली आहे. फुटबॉल खेळतांना झालेल्या किरकोळ वादावरून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच रिक्षाच्या काचा फोडल्या. आरोपी हे अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water supply : मोठा दिलासा! मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

अब्दुल अमीरउल्ला खान (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार अल्पवयीन मुले आणि खान हे एकाच भागात राहायला आहेत. दरम्यान ते फुटबॉल खेळत असतांना त्यांच्यात वाद झाले होते. 

दरम्यान काल रात्री, खान आणि त्याचे मित्र, महेश मिश्रा, आयुष दुचाकीवरुन येरवडा येथून जात असतांना चार अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवले. काही कळायच्या आत चौघांनी खान याचा मित्र मिश्राला बांबुने मारहाण केली. तसेच येथील दोन रिक्षांच्या काचा त्यांनी फोडल्या. यानंतर त्यांनी परिसरात दहशत माजवत पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चारही आरोपींना अटक केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या