मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “…तर तो उपमुख्यमंत्रीही राहणार नाही”, भाजपच्या माजी खासदाराकडून देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख

“…तर तो उपमुख्यमंत्रीही राहणार नाही”, भाजपच्या माजी खासदाराकडून देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख

Dec 24, 2022, 06:27 PM IST

  • Subramanian swamy on devendra fadanvis : पंढरपूर कॅरिडॉरवरून स्थानिक राजकारण पेटलं असून यावर ठाम असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर भाजप नेते टीका करत आहे. भाजपचे माजी खासदार  सुब्रह्मण्यम स्वामी यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला आहे.

देवेंद्र फडणवीस

Subramanian swamy on devendra fadanvis : पंढरपूर कॅरिडॉरवरून स्थानिक राजकारण पेटलं असून यावर ठाम असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर भाजप नेते टीका करत आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला आहे.

  • Subramanian swamy on devendra fadanvis : पंढरपूर कॅरिडॉरवरून स्थानिक राजकारण पेटलं असून यावर ठाम असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर भाजप नेते टीका करत आहे. भाजपचे माजी खासदार  सुब्रह्मण्यम स्वामी यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला आहे.

पंढरपूर कॅरिडॉरवरून (pandharpur corridor) भाजपमध्येच राजकीय वातावरण तापलं आहे.देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दावा केला आहे की, कोणीही मध्ये आलं तरी तिरुपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूरचं कॉरिडॉर होणारच. यावर भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian swamy) यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हटले की, मी आव्हान देऊन सांगतो कीपंढरपूर कॅरिडॉर होणार नाही आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, असं म्हणत फडणवीसांना इशारा दिला. स्वामी यांनीही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांप्रमाणे या कॉरिडॉरला विरोध करत या कॉरिडॉरऐवजी पंढरपूरमधील इतर कामांना आणि कनेक्टीव्हीटीला प्राधान्य द्यावं असं म्हटलं आहे. स्वामी आज सोलापूर दौऱ्यावर असताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजकारण चांगलंच तापलं आहे. वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २०३० कोटी ७० लाख रूपये खर्चाचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.

काही स्थानिक कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याचा इशारा देत आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉरिडॉर संदर्भात ठाम असून काहीही झालं तरी हा कॉरिडॉर होणारच, असं सांगत आहेत. फडणवीसांवर टीका करताना फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असा इशारा भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी देत आहेत. त्यामुळे भविष्यात पंढरपूर कॅरिडॉरचा मुद्दा पेटणार आहे.

पुढील बातम्या