मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Petrol-Diesel : ट्रक-टँकर चालकांचा संप, पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती, टाकी फुल्ल करण्यासाठी पेट्रोल पंपावर झुंबड

Petrol-Diesel : ट्रक-टँकर चालकांचा संप, पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची भीती, टाकी फुल्ल करण्यासाठी पेट्रोल पंपावर झुंबड

Jan 01, 2024, 11:13 PM IST

  • Petrol Diesel Shortage : राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही, या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे.

विविध ठिकाणी पेट्रोल पंपावर झालेली गर्दी

Petrol Diesel Shortage : राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही, या भीतीने राज्यभरातीलपेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे.

  • Petrol Diesel Shortage : राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही, या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यतातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक-टँकर चालकांनी संप सुरू केला आहे. यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होऊन इंधन मिळणार नाही, या भीतीने राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी केली आहे. ट्रक चालकांच्या आंदोलनाचा सोमवारी सायंकाळपासून परिणाम दिसू लागला आहे असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप बुधवार (३ जानेवारी) पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागल्याचेही चित्र आहे. तर दोन दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही. भीतीने पेट्रोल पंपाबाहेर टाकी फूल्ल करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान संप लांबल्यास अन्य वाहनांबरोबरच इंधन अभावी एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती आहे. 

हे ही वाचा -   मोदी सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रकचालक रस्त्यावर, उरणमध्ये पोलिसांवर हल्ला

दुचाकी-चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर केलेल्या गर्दीमुळे अर्धा ते एक तास रांगेत उभे रहावे लागत असल्याचे चित्र आहे. मात्र पेट्रोलसाठी लोक तासभऱ लाईनमध्ये थांबत आहेत. दरम्यान मनमाडमधून इंधन वाहतूक ठप्प असल्याने नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम उद्या (मंगळवार) दिसून येण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप सुरळीत चालू राहणार असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनने दिली आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या