मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Crime News : मालेगावात लुटीसाठी भरदिवसा गोळीबार; आरोपीला पकडताना वृद्धाचा मृत्यू!

Crime News : मालेगावात लुटीसाठी भरदिवसा गोळीबार; आरोपीला पकडताना वृद्धाचा मृत्यू!

Aug 13, 2022, 10:15 AM IST

    • Malegaon Crime News : मालेगांवमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दरोडेखोरांनी लुटीसाठी हे कृत्य केल्याची माहिती आहे.
Malegaon Crime News (HT_PRINT)

Malegaon Crime News : मालेगांवमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दरोडेखोरांनी लुटीसाठी हे कृत्य केल्याची माहिती आहे.

    • Malegaon Crime News : मालेगांवमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दरोडेखोरांनी लुटीसाठी हे कृत्य केल्याची माहिती आहे.

Malegaon Crime News : नाशिक जिल्ह्यातील मालेगांव हे शहर गुन्हेगारीचं नेहमीच चर्चेत असतं. आता मालेगावात दरोडा टाकण्याच्या उद्देशानं भरदिवसा गोळीबार झाल्याचं शहरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. दरोडेखोरांनी लुटीसाठी हवेत गोळीबार केल्यानंतर स्थानिकांनी प्रसंगावधान राखल्यानं दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगावात काही दरोडेखोरांनी गावठी कट्टा आणि कोयत्याचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या प्रयत्नात होते, परंतु शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळं दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. त्यानंतर लुटारूंनी गोळी झाडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. दरेगाव शिवारातील फेमस मार्केट परिसरात घटलेल्या या घटनेत पवारवाडी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नेमकं काय घडलं?

मालेगावात व्यापारी असलेल्या दिनेश रुंग्ठा यांचा गिट्टीचा कारखाना आहे. ते सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात पोहचल्यानंतर त्यांनी ५० हजारांची कॅश ड्रॉवरमध्ये ठेवली. त्यांच्यावर काही दरोडेखोरांची नजर असल्यानं चार लोकांनी त्यांच्या दुकानात घुसून कोयता आणि गावठी कट्ट्यानं रुंग्ठा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. परंतु ऐनवेळी स्थानिक लोकांनी दुकानाकडं धाव घेतल्यानं चोरट्यांची भंबेरी उडाली, चार दरोडेखोरांतील एकानं गावठी कट्ट्यातून गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी असलेल्या सईद अहमद, शहजाद मेहमूद, यासीन, राजू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

झटापटीत वृद्धाचा मृत्यू...

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दरोडेखोरांनी व्यापारी दिनेश रुंग्ठा यांच्या दुकानात शिरून त्यांना मारहाण करत लुटायचा प्रयत्न केला तेव्हा एक वृद्धानं चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अचानक हार्ट अटॅकचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या